भारत चिल्ड्रन अकॅडमी वालचंदनगर आदर्श घ्यावे अमोलराजे भोसले.
राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार
इंदापूर प्रतिनिधी: शाळा ही समाजाची प्रतिकृती असून आज शाळेत घडणारी पिढी उद्याची संप्पत्ती असतें. आणि हीच संपत्ती भविष्यात समाजाचा एक घटक बनून कार्यरत असतें. त्यातून देश घडतो आणि अशा आदर्श शाळांमधून आदर्श समाजाची निर्मिती होते. असे मत स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी व्यक्त केले. अक्कलकोट येथील यशवंत- शरद डेव्हलपमेंट व्हिजन या संस्थेच्या वतीने आयोजित "मातोश्री प्रमिला आदर्श शाळा पुरस्कार" वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज निकम हे होते. यावेळी मंचावर संयोजक तथा यशवंत शरद चे संस्थापक प्रा. प्रकाश सुरवसे, इंदापूर चे पत्रकार अमोल राजपूत उपस्थित होते.
अक्कलकोट येथील अजिंक्यतारा हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. वालचंदनगर उद्योग समूह संचलित भारत चिल्ड्रन अकॅडमी या शाळेला यशवंत- शरद च्या वतीने "मातोश्री प्रमिला आदर्श शाळा पुरस्कार" अमोलराजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी बी.सी.ए.सर्व शिक्षक , शिक्षिका व सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अमोलराजे म्हणाले "यशवंत - शरद" या संस्थेने चांगली सुरुवात केली असून भविष्यात असेच उपक्रम आयोजित करावेत अन्नछत्र मंडळाचे सदैव सहकार्य राहील असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज निकम म्हणाले, पुरस्कार ही झालेल्या कामाची पोहोचपावती तर पुढच्या कामाची इसारत असतें त्यामुळे या पुरस्काराची प्रेरणा घेऊन ही शाळा भविष्यात मोठी कामगिरी करेल.
यावेळी राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने यांनीही यशवंत शरद ची उद्दिष्ठे सांगून भविष्यात असेच उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले. यावेळी सागर यलवार, कृष्णा सुरवसे, गणेश भोसले, चंद्रकांत कुंभार व वालचंदनगर येथील शिक्षक संख्येने उपस्थित होते.
चौकट :यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार यांच्या सयुंक्त विचारांचा जागर करताना समाज परिवर्तनासाठी हे विचार कृतीतून पाझरले पाहिजेत. या हेतूने स्थापन केलेल्या संघटनेकडून हा पुरस्कार देताना विशेष आनंद होतो आहे. एकूण ६५ पैकी ५५ महिला शिक्षिकांना काम करण्याची संधी देऊन या संस्थेने पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा आदर्श निर्माण केला आहे. प्रत्यक्ष भेट देऊन शाळेची सर्वंकष पाहणी केली असता स्वप्नातील शाळा वाटावी असे नियोजनबद्ध वातावरण पाहून हा पुरस्कार दिला.
- प्रा. प्रकाश सुरवसे, संस्थापक, "यशवंत-शरद डेव्हलपमेंट व कोणताही प्रस्ताव न घेता आमच्या शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला पुरस्कार दिला. याचा आनंद वाटतो. स्वामी समर्थांच्या नगरीत हा पुरस्कार स्वीकारताना एक नवीन आत्मविश्वास मिळाला. या पुरस्काराच्या प्रेरणेने आमची शाळा यापुढेही अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील - कृष्णदेव क्षीरसागर, प्राचार्य, भारत चिल्ड्रन अकॅडेमी, वालचंदनगर.
चौकट :यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर, शाळा समितीचे अध्यक्ष आशिष केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे, बी.सी.ए.मधिल सर्व शिक्षक, शिक्षिका शाळाचे यांचे अभिनंदन केला.

