shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमेश खेमनर यांनी सापडलेला आयफोन मोबाईल मालकास केला परत..!!


पत्रकार रमेश खेमनर यांनी दाखविला प्रामाणिकपणा सापडलेला आयफोन मोबाईल मालकास शोध घेऊन पोलीस स्टेशनमार्फत मोबाईल केला परत

राहुरी । प्रतिनिधी: राहुरी येथील युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार रमेश खेमनर यांनी सापडलेला महागडा आयफोन (iphone)  मोबाईल धारकाचा शोध घेऊन मोबाईल परत  करून दाखवलेल्या प्रामाणीकपणामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 सविस्तर माहिती अशी की राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे दिनांक: 24 एप्रिल 2022 रोजी तमनर व बाचकर यांच्या शुभविवाहास पत्रकार रमेश खेमनर यांनी उपस्थिती होते विवाह सोहळा पार पडून ते पांडुरंग लॉन्समधुन निघाले असता त्यांना पार्किंग मध्ये आयफोन कंपनीचा मोबाईल आढळला असता त्यांनी व त्यांचे चुलत बंधू  योगेश खेमनर यांनी पांडुरंग लॉन्समधील लग्न समारंभातील उपस्थितीतांना मोबाईल सापडल्याची सूचना मांडली व वधू वराच्या कुटुंबीयांना मोबाईल सापडलेल्याची कल्पना दिली व  कोणाचा मोबाईल हरवलेला असल्यास ओळख पटवून घेऊन जाण्याची सूचना केली. परंतु कोणीही मुख्य मोबाईलधारक आढळुन आले नाही त्यानंतर पत्रकार रमेश खेमनर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल सापडल्याची पोस्ट व्हायरल केली. 

मोबाईल मध्ये सिम कार्ड नसल्यामुळे व पासवर्ड लॉक असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. कोणीही मोबाईल मालक न सापडल्यामुळे त्यानंतर सायंकाळी पोलीस स्टेशनला कॉल करून मोबाईल सापडल्याची माहिती दिली व मोबाईल हरविल्याची तक्रार आल्यास आम्हांला संपर्क करण्याचे पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. 

 मोबाईलच्या डिसप्लेवर प्रोफाईलवर प्रसाद कुलकर्णी नाव व  वय 18 असे आढळुन आल्याने राहुरी येथे प्रसाद कुलकर्णी नामक तरुणाचा शोध घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशीही  पत्रकार रमेश खेमनर व त्यांचे मित्र रोहित उघडे व राजू पटारे यांनी राहुरी येथील शुक्लेश्वर येथील कुलकर्णी नामक व्यक्तींशी संपर्क करून माहिती दिली. व प्रसाद कुलकर्णी नामक तरुणाचा शोध घेण्यास सुरवात केली असता गणेश मंगल कार्यालयाचे मालक यांचे प्रसाद कुलकर्णी नातेवाईक असल्याची माहिती मिळाली व ते पांडुरंग लॉन्स येथे इव्हेंटसची काम करण्यासाठी गेले असता  त्यांचा मोबाईल हरविल्याची माहिती त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांना दिलेली होती.

 परंतु रमेश खेमनर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःहून संपर्क करून सापडलेल्या मोबाईल मालकाचा शोध घेतला व त्यांना मोबाईल आमच्याकडे असून आपणांस  मोबाईलची ओळख पटवून पोलीस स्टेशन येथे येऊन मोबाईल घेऊन जाण्यासाठी बोलावले व त्या मोबाईल मालक प्रसाद कुलकर्णी  व अनिल जोशी व पत्रकार रमेश खेमनर यांनी पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांच्याशी चर्चा करून मोबाईलची ओळखची पटवून मोबाईल परत देण्यात आला.

 या कार्याबद्दल राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोबाईल धारकास मोबाईल परत मिळून दिल्याबद्दल पत्रकार रमेश खेमनर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. सध्याच्या काळात अशी प्रामाणि लोक फार कमी मिळतात अशा प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व अनिल जोशी यांनी दिल्या व अनिल जोशी यांनी व तसेच यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांनीही कौतुक केले व मोबाईल मालक प्रसाद कुलकर्णी व अनिल जोशी यांनी रमेश खेमनर व  त्यांच्या  सहकाऱ्यांचे आभार व्यक्त  केले.
close