नगर । प्रतिनिधी (निरज जेठे):-
सध्या पवित्र रमजान निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते. देशात एकात्मता- भाईचारा, शांतता राखली जावी,सर्वधर्मिय जातीय सलोखा जोपासला जावा, समाजा-समाजामध्ये एकता आणि सामाजिक सलोख्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात..!
आज देशात हिंदू- मुस्लिम बांधवांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित असताना काही विघ्न संतोषी विघ्न आणून देशात अशांतता निर्माण करून स्वतःसाठी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करीत आहेत. यासाठी नगर तालुक्यातील देहरे हे गाव अपवाद आहे..!
येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमात कुठलाही भेद भाव न ठेवता वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे येथील वातावरण सदैव चांगले असते...! हा एक देशातील सर्वांसाठी आदर्शच आहे.
याचे ताजे उदाहरण म्हणजे देहरे येथील मस्जिद मध्ये रोजा इफ्तार पार्टीचे निमित्ताने समस्त ग्रामस्थ देहरे यांनी मुस्लिम बांधवांसाठी खास जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर आदर्शवत सत्कार्यासाठी पंचायत समिती सदस्य व्ही.डी.काळे पाटील यांनी नियोजन केले होते, यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत पत्रकार नबाबभाई शेख,माजी सरपंच अब्दुलभाई शेठ खान ,जुनेदभाई खान, इलियास भाई सय्यद, फिरोज भाई शेख यांनी अतिशय आदरपूर्वक केले.
सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सनीभाऊ लांडगे, महेश भाऊ काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच किसन धनवटे नवनिर्वाचित सोसायटी संचालक यशवंत काळे, अनिल करंडे,गणपतराव काळे, रोहीदास जाधव माजी चेअरमन दिलीप करंडे, ज्ञानेश्वर लांडगे, संचालक साईनाथ काळे,हरिदास करंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य नवनाथ करंडे, अनिल चोर , अजित काळे,किरण लांडगे उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमात हजेरी लावली.
भोंगा ,अजान यात सम्पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. काही समाज कंटक आपली राजकीय पोळी भाजण्याचे दृष्टीने हे घाणेरडे राजकारण करत आहे. मात्र विविध शहरांत गावात सर्वसामान्य हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय आपला सामाजिक एकोपा जपत एकजुटीने राहून आपले नाते घट्ट करीत आहेत. त्यात कुणीही आग लावू शकत नाही. असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य व्ही.डी.काळे यांनी केले. त्यातीलच एक उदाहरण देहरे ग्रामथ्यांच्या वतीने आज देहरे मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले .
मस्जिद कडुन सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत सदस्य हाजी साजितभाई शेख यांनी आभार मानले व सदर सामाजिक सलोखा, हिंदू-मुस्लीम ऐक्य अबाधित राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.

