प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन 2022 अर्थात पहिले वर्षी सुरूवात करण्यात आली आहे.
हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच ,समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हे पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केले आहे.
सुनिल ज्ञानदेव भोसले वृत्तपत्र संपादक ते समाजात विविध उपक्रम राबवित असतात. आजच्या काळात अशी उल्लेखनीय काम करणारे माणस मिळणे कठीण आहे . या सन्मानामुळे सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

