shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छावा आक्रमक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छावा आक्रमक..!!


अहमदनगर : धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळाप्रश्नी अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे. १४ मे रोजी संभाजी राजे यांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत नियोजित ठिकाणी बसवावा अन्यथा मनपामध्ये जागरण गोंधळ घालण्याचा इशारा छावाच्यावतीने देण्यात आला आहे.
याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी प्रदेश संघटक अशोक चव्हाण, महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा सांगळे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव दत्ता वामन, रावसाहेब काळे, विलास तोडमल, विलास कराळे, विशाल बेरड, सतीश वाघ, विलास काळे, लक्ष्मण ढगे, सुनील सकट, अशोक भोसले, आशा गायकवाड, सविता शिंदे, सुशीला हरिचंद्रे, रशिदा सय्यद, रंजनाताई ताठे, मंदा सुपेकर, मीनाक्षी जाधव, सुरेखा कडूस, अरुण ढाकणे, सुनील ठाकरे, बापू ठाणगे, अरविंद जज्जर, मकासरे आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्यासाठी पाठपुरावा करत आहे. पुतळ्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार मार्गदर्शकनुसार पालिकेने ठराव मंजूर केलेला असून पुतळा बसवायचे काम तात्काळ सुरू करावे, अटी व शर्तीनुसार सर्व पूर्तता झालेली आहे. १४ मे रोजी धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती असून या दिवसापर्यंत महापालिकेने पुतळा अनावरण कार्यक्रम ठेवावा. राजे यांच्या पुतळ्यासाठी नगरकर व नगरसेवकांनी पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घेतलेला असून या सर्वांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे. मनपाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनपामध्ये जागरण गोंधळ घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close