शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२
औरंगाबाद खंडपीठाचा निकाल; सहा आरोपींचा समावेश...
शिर्डीची धिवर, नगरची कर्डिले टोळी हद्दपारीचे आदेश कायम..!!
अहमदनगर : जिल्ह्यात संघटीतपणे गुन्हे करणार्या दोन टोळ्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपार केल्या होत्या. त्याविरोधात आरोपींच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये क्रिमिनल रिटपिटीशन दाखल करण्यात आले होते. यावर सुनावणी घेऊन खंडपीठाने दोन्ही टोळ्याविरोधात केलेले हद्दपारीचे आदेश कायम ठेवले आहेत. यामध्ये नितीन आण्णा धिवर (वय 32 रा. भिमनगर, शिर्डी ता. राहाता) व सागर विठोबा कर्डिले (वय 34 रा. वारूळवाडी ता. नगर) यांच्या टोळ्यांचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील टोळीप्रमुख नितीन धिवर व टोळीसदस्य सचिन सिताराम गायकवाड (वय 32 रा. भिमनगर शिर्डी ता. राहाता) यांनी संघटीत टोळी तयार करून शिर्डी, राहाता पोलीस ठाणे हद्दीत तसेच जिल्ह्यात संघटीतपणे गैरकायदा मंडळी जमवणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्र बाळगुन दुखापत करणे, किरकोळ कारणावरून गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण केली होती. सदर टोळीचा प्रमुख व टोळीतील सदस्य यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 18 ऑगस्ट, 2021 रोजी 18 महिणेकरीता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतुन हद्दपार केले होते.
तसेच टोळीप्रमुख सागर कर्डिले, टोळीसदस्य सचिन उर्फ लखन मंजाबापु वारूळे (वय 28), गणेश गोरख साठे (वय 29), विशाल शहाराम वारूळे (वय 26 सर्व रा. वारूळवाडी ता. नगर) यांनी संघटीत टोळी तयार करून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे तसेच अहमदनगर जिल्हा परिसरात संघटीतपणे गैरकायद्याची मंडळी जमवुन दुखापत करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, रस्ता आडवुन मारहाण करणे, जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण केली होती. सदर टोळीला अधीक्षक पाटील यांनी 15 जुलै, 2021 रोजी 15 महिन्याकरीता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतुन हद्दपार केले होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

