प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : ८ / अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती,सोलापूर यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेविका , आदर्श माता,साने गुरुजी गौरव ,वृक्षमित्र ,कोरोना योध्दा,निबंध स्पर्धा समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी अवधूत म्हमाणे (ज्येष्ठ बालसाहित्यिक ) प्रमुख अतिथी म्हणून शामराव कराळे अध्यक्ष – अ.भा.साने गुरुजी कथामाला , मुंबई तर प्रमुख उपस्थितीत सौ .श्रुती श्री . वडगबाळकर अध्यक्ष -महाराष्ट्र साहित्य परिषद , सोलापूर , सुनील पुजारी प्रमुख कार्यवाह -अ.भा.साने गुरुजी कथामाला , मुंबई , प्रा.अशोक म्हमाणे उपाध्यक्ष – अ.भा.साने गुरुजी कथामाला, मुंबई हे आहेत.
पुरस्काराचे मानकरी डॉ.वीणाताई सुराणा स्मृती आदर्श समाजसेविका पुरस्कार ,ॲड.सविता बाळकृष्ण शिंदे पुष्पा भातंब्रेकर स्मृती आदर्श माता पुरस्कार , सौ .लक्ष्मी तुळशीदास यलगेटी साने गुरुजी सेवा गौरव पुरस्कार ,अरुण बाबुराव धुमाळ हे आहेत.
हा कार्यक्रम रविवार दि . १० एप्रिल २०२२ दुपारी ३.३० वा. समाजकल्याण केंद्र,रंगभवन चौक ,सोलापूर या ठिकाणी होणार असून त्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्षा सौ.आरती काळे , कार्यवाह अशोक खानापुरे ,सौ. उज्वला साळुंके सहकार्यवाह आणि रामचंद्र धर्मसाले प्रसिध्दी प्रमुख यांनी केले आहे .

