shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे परदेशी उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न...!


श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :-  येथील बोरावकेनगरमधील    विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे  रोहित राजीव शिंदे (अमेरिका), अजिंक्य रामनाथ सावंत (जर्मनी),डॉ.शेखर प्रकाश मेहेकरकर (ऑस्ट्रोलिया) या  परदेशात उच्च शिक्षण घेत असलेले श्रीरामपूरातील युवकांचा येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे शुभेच्छापर येथील ऍड.रावसाहेब शिंदे संचालित विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कुल,शिंदेनगर ऐनतपूर येथे हा सन्मान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थापक सचिव आणि मुख्य आयोजक सुखदेव सुकळे यांनी नियोजन केलेल्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान डॉ. राजीव शिंदे यांनी भूषविले. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि ऍड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. 

यावेळी ऍड.भागचंद चुडिवाल यांच्याहस्ते रोहित शिंदे यांना गौरवचिन्ह, शाल,बुक,बुके देऊन सन्मानित करण्यात आले तर याच पद्धतीने अजिंक्य सावंत यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रसिद्ध इंजिनिअर्स, आर्किटेक्ट प्रकाश पाटील निकम यांच्या हस्ते तर डॉ.शेखर मेहेरकर यांचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजीव शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.याप्रसंगी डॉ.प्रेरणाताई शिंदे,माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, प्रतिष्ठानचे समनव्यक,मार्गदर्शक,  साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ,प्राचार्य विनोद रोहमारे,प्राचार्या रंजना जरे, सतीश थोरात, रामनाथ सावंत, सौ.मंजिरी सावंत, विद्यानिकेतन स्कुलचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक,विद्यार्थी उपस्थित होते.रोहित शिंदे, अजिंक्य सावंत,डॉ.शेखर मेहेकरकर यांनी इंग्रजीमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न समजून घेऊन उपयुक्त उत्तरे दिली.डॉ.राजीव शिंदे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून शिक्षण आणि ध्येय याविषयी विवेचन केले.सुखदेव सुकळे हे २०१८ पासून आपल्या प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक उपक्रम आयोजित करतात हे सेवेचे कार्य असल्याचा त्यांनी सांगून विद्यार्थी आणि पालक यांचे अभिनंदन केले,वर्षा धामोरे मॅडम यांनी सुंदर सूत्रसंचालन करून आभार मानले.
close