गैरकारभाराविरुद्ध मुसा पटेल यांची मा.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !
मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील
संबंधितांना पाठिशी घालण्याचा प्रकार ?
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- हल्ली जिल्ह्याच्या पुरवठा खात्यात मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असुन,राजरोसपणे होणाऱ्या रेशन अन्नधान्य काळा बाजाराला मोठा उत आल्याचे दिसून येत आहे,आगदी खालपासून ते वरपर्यंत सर्वत्र साखळी पद्धतीने आपापल्या वरकमाईची ठरावीक रक्कम स्वतःच्या खिशात घालुन महसुल खात्यातील काही खादाड महाभाग अक्षरशः मुग गिळून गचपडी घेत असल्याचे जाणवत आहे ?
याविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा धाडसी पत्रकार आणि एकलव्य लहुजी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मुसा पटेल यांनी वेळोवेळी महसुल खात्याच्या वरिष्ठांना निवेदनाद्वारे कळविले असताना देखील त्याची कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही, मग नेमके पाणी मुरते तरी कुठे ?, याचा मोठा संशय देखील बळावत असल्याचे श्री.पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री मॅडम यांच्या भ्रष्टाचाराविरोधात श्रीरामपूर तालुक्यातील "एकलव्य लहुजी सेवा संघ" संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपण मा.जिल्हाधिकारी महोदय अहमदनगर यांच्याकडे सदरील गैरकारभाराविषयी वेळोवेळी अनेक तक्रारी/ निवेदने दिली मात्र त्यावर आजपावेतो कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही म्हणून आपण येत्या ११ एप्रिल २०२२ रोजी पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी तसेच प्रशासकीय बाबतीत अख्ख्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे, त्याच मोठ्या जिल्हात जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडमचा भ्रष्टाचारही तीतकाच मोठा आहे,जो दिसायला जरी छोटा वाटतो,मात्र त्याची आकडेमोड केल्यास अक्षरशः कोटींच्या घरात जाईल.
पुरवठा अधिकारी माळी मॅडम या गोरगरिबांच्या धान्याच्या जोरावर कशाप्रकारे गब्बर बनल्या आहेत आणि जिल्ह्याच्या १४ तालुक्यातील पुरवठा विभागात कशाप्रकारे घोटाळेवजा भ्रष्टाचार करतात,त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण,अहमदनगर जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी साहेबांना मुद्देसूदपणे तक्रार केली होती,त्या तक्रारीला आज पंधरा दिवस उलटून गेले तरी संबंधित मॅडमवर कुठलीही कारवाई करण्यात आलेले नाही,याचा अर्थ या भ्रष्टाचाराच्या गटारीत सर्व एकमेकांच्या सहमतीने सुळक्या घेत आहेत,म्हणून "तेरी भी चुप आणि मेरी भी चुप" चा अवलंब केला जात असल्याचे जाणवते आहे ? पुरवठा खात्यातील होत असलेल्या गैरकारभाराचे पुरावे देऊनही संबधित मॅडमवर कारवाई न करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालण्यासारखेच आहे.त्यासाठी संविधानिक मार्गाने आपण सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी उपोषणाचा मार्ग स्विकारुन न्याय मागणार आहे, त्यातून काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महसुल प्रशासनावरच राहील असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.

