shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर ग्रामपंचायतीच्या वतीने पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल शैलेश देवराव मोरे यांचा सत्कार.

निमसाखर ग्रामपंचायतीच्या वतीने पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल  शैलेश देवराव मोरे यांचा सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी:आज निमसाखर ग्रामपंचायतीच्या वतीने  शैलेश देवराव मोरे या युवकाचा सत्कार करण्यात आला. शैलेश मोरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये यश संपादन केले असून आई-वडिलांचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचा सत्कार निमसाखर ग्रामपंचायतीचे सरपंच  धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

वडील  देवराव मोरे व आई सौ. अलकाताई मोरे तसेच भाऊ निलेश मोरे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच जिद्द व चिकाटी यामुळे  ही परीक्षा उत्तीर्ण झालो असून त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही असे शैलेश मोरे यांनी यावेळी सांगितले.
 त्यांनी २४६ गुण मिळवत या परीक्षेत यश संपादन केले.
यावेळी निमसाखर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक  भिलारे , निमसाखर ग्रामपंचायतीचे सदस्य  राजेंद्र रणमोडे , सुदाम भोसले, ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. नीता माने, सौ शहानूर मुलानी तसेच ग्रामपंचायतीचे क्लर्क श्री विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
close