खेळातील सहभागाने मुलांचा आत्मविश्वास वाढतो - प्राचार्य अशोक बेरड
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २१ / येथे भव्य-दिव्य अशा १९ व्या टिम टॉपर्स स्केटींग अकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय स्पीड स्केटींग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरातून अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये हारमोनी इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला . या स्पर्धा वयोगटानुसार व स्केट प्रकारानुसार घेण्यात आल्या. तसेच ३०० मी. रेस व ५०० मी. रेस अशा दोन प्रकारच्या रेसचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये हारमोनी स्कुलच्या आदर्श मुथ्था याने एक सुवर्ण एक रौप्य, ईश्वरी भापकर हिने एक रौप्य एक कांस्य, आराध्या सोनवणे हिने एक कांस्य, मोहित बाकणे याने एक रौप्य, एक कांस्य, वेदांत शिंदे याने दोन रौप्य, मुस्तफा पठाण याने दोन कांस्य, दक्ष चंपानेरकर याने एक सुवर्ण व एक रौप्य अशी पदके मिळविली. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा प्रशिक्षक अमोल ठोंबे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी हारमोनी स्कूलचे प्राचार्य अशोक बेरड यांनी सांगितले की, मूलांनी विविध खेळ प्रकारामध्ये सहभाग घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास तसेच मनोबल वाढते .
प्राचार्य अशोक बेरड, त्रावणकोर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष बिना थंपी, डायरेक्टर नंदिता दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

