shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्रच नव्हे तर देश घेईल - खासदार सुप्रियाताई सुळे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्रच नव्हे तर देश घेईल - खासदार सुप्रियाताई सुळे.
इंदापूर प्रतिनिधी: आदर्श शहर कस असाव हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूरला या आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या गोष्टी शिकत असतो असे म्हणत इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे.  दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्रच नव्हे तर देश घेईल अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी दत्तात्रय भरणे यांची कौतुक केले.

इंदापूर शहरातील आयटीआय इंदापूर नवीन वर्गखोल्या, तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष उपाहारगृह इंदापूर शहरांतर्गत चौक सुशोभिकरण व अंतर्गत पथदिवे तसेच विरश्री मालोजीराजे भोसले चौकातील सुशोभीकरण यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी सुप्रियाताई सुळे बोलत होत्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून इंदापूरचा जो चेहरामोहरा बदलला आहे
 ही बाब अतिशय कौतुकाची असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर ची उंची वाढवली आहे. काळ बदलत चाललेला आहे. लोकांच्या गरजा वाढत आहेत. स्वच्छ पाणी, विज याबरोबर शहरांचे सुशोभीकरण करून हे शहर स्वच्छ ठेवणे हे ज्यांची सत्ता आहे त्याची ती नैतिक जबाबदारी आहे. दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषद मधूनच त्यांचे काम दाखवण्यास सुरुवात केली. त्यांचे काम पाहून पक्षाने त्यांना मंत्रिपद दिले. एखाद्या मंत्र्याचा मतदार संघ कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले. राज्यमंत्री असताना असं काम केलं. मंग कॅबिनेट झाले तर काय करतील अशा शब्दात सुप्रियाताई सुळे यांनी दत्तात्रय भरणे  यांच्या कार्याची स्तुती केली.
close