जनतेने दिलेल्या मंत्रिपदाच्या खुर्ची चा उपयोग तालुक्यातील जनतेसाठी इमानेइतबारे करीत आहे - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:जनतेने दिलेल्या मंत्रिपदाच्या खुर्ची चा उपयोग तालुक्यातील जनतेसाठी इमानेइतबारे करीत असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डाळज नंबर 2 येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एक दोन तीन व पंचक्रोशीत २९ कोटी आठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की जनतेने दिलेल्या मंत्रिपदाच्या खुर्ची चा उपयोग तालुक्यातील जनतेसाठी इमानेइतबारे करीत आहे गावाला पूर्वी पाहूनही फिरकत नव्हता अशी रस्त्यांची दुरावस्था होती मात्र हे चित्र पलटले आहे कोरोना च्या महाभयंकर संकटातही इंदापूर चा विकास थांबला नाही. विरोधक आज मोठ्या गप्पा मारतात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून मिरवतात कोरोना च्या काळात मात्र ज्यावेळी गोरगरिबांची चूल बंद झाली होती तेव्हा कुठे गेला होतात ? कोणाच्या काळात मी स्वतः या गावात आलो होतो गरजूंना मदत केली मात्र विरोधकांनी साधी चहाची पुढेही वाटली नाही असा आरोप भरणे यांनी केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, युवा नेते दीपक जाधव, डी एन जगताप, नंदकुमार पानसरे यासह सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

