shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार चे देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष पदी शेख व मुसमाडे यांची निवड...!

देवळाली प्रवरा - दि. १७ एप्रिल 
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर उपाध्यक्ष पदी अबिद शेख व ओंकार मुसमाडे यांची निवड करणेत आली.  


      प्रहार जनशक्ती पक्षाचे  देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय बाळासाहेब कुमावत यांनी आज प्रमाणपत्र देऊन अबिद शाकिर शेख व ओंकार बाबासाहेब मुसमाडे यांची उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.प्रसंगी प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, मिराज शेख, जालिंदर सोनवणे, आंजर शहा आदी उपस्थित होते.

     या प्रसंगी शेख व मुसमाडे यांचे अभिनंदन करताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की,  नामदार बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांचे सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी व ना. बच्चूभाऊ कडू यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणेचे आणि प्रहार संघटना वाढीचे काम आम्ही सातत्याने करीत राहणार असून. ज्या युवकांना प्रहार चे कार्य व विचार आवडतात त्यांनी प्रहार मध्ये यावे त्यांचे स्वागत असल्याचे ढुस यांनी सांगितले.
close