shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबांच्या रांगोळीची 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये नोंद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                  गुरूवार दिनांक १४ एप्रिल २०२२

साईबाबांच्या रांगोळीची 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये नोंद..!!

शिर्डी : श्री साईबाबांच्या ऐतिहासिक १११ व्या श्री रामनवमी उत्साहात डोळ्यांचे पारणे फेडणारी ४० हजार स्के.फुटाच्या श्री साईबाबांच्या रांगोळीची  वर्ल्ड बुक आँफ लंडनमध्ये दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या उत्साहात प्रथमच अशाप्रकारे शिर्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. हि सर्व शिर्डी ग्रामस्थांसाठी भुषणावह बाब असल्याची प्रतिक्रिया श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली.

दरम्यान यंदाच्या वर्षी शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या रामनवमी उत्साह मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यादरम्यान अनेक करमणुकीचे कार्यक्रमाचे आयोजन श्री साईबाबा संस्थान तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमात पहिल्यांदाच साईनगर येथील मैदानावर गायीच्या शेणाने तसेच गोमूत्र टाकून त्यावर ४० हजार स्के.फुटाची भव्य अशी श्री साईबाबांची रांगोळी साकारण्यात आली होती.

साईबाबांच्या रांगोळीची 'वर्ल्ड बुक ऑफ लंडन'मध्ये नोंद
७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

यासाठी सुमारे ७ हजार किलो रांगोळीचा वापर केला गेला असून मुंबई येथील ४० कलाकार यांच्या अथक प्रयत्नांनी हि दिव्य आणी सुरेख अशी रांगोळी साकारली.या रांगोळीची दखल वर्ल्ड बुक आँफ लंडन मध्ये घेण्यात आली.त्यानुसार बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी वर्ल्ड बुक आँफ लंंडनचे संतोष शुक्ला, दिलीप पंडित, मेहमूद सैय्यद यांच्या हस्ते देण्यात आले.



यावेळी माजी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, मा.नगरसेविका आशाताई कोते, रजनीताई जोगळेकर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाबासाहेब कोते, शिर्डी रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, निलेश कोते, नितीन कोते, जगन्नाथ गोंदकर, दादाभाऊ गोंदकर,अरविंद कोते, ताराचंद कोते, सचिन तांबे, जितेंद्र शेळके, मंगेश त्रिभुवन, हरिश्चंद्र कोते, रवींद्र कोते, राहुल गोंदकर, विजय कोते, राजेंद्र कोते, तुषार शेळके, विकास गोंदकर,अविनाश गोंदकर, देवराम सजन, अजय नागरे, सुनील परदेशी, सलीम शेख, सुनील बारहाते, अनिल पवार, छत्रपती शासन, शिर्डी युवा ग्रामस्थ, मुंबई भांडुप येथील रांगोळी कलाकार सुर्वे, रांगोळी कमिटीचे अध्यक्ष मुकुंद गोंदकर, उपाध्यक्ष मनिलाल पटेल, प्रकाश गोंदकर, प्रतिक शेळके आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला भगीनी व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी रांगोळी कलाकारांचा यात्रा कमिटीच्या वतीने सर्टिफिकेट सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला असून आम्हाला श्री साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य असल्याचे सुर्वे काका यांनी सांगितले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

 

close