shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोड शेडिंग त्वरीत बंद करा अन्यथा ....


नगर शहर शिवसेनेने एमएससीबी ला दिला आंदोलनाचा ईशारा

प्रतिनिधी : आकाश लोणकर

नगर :२६ /  नगर शहरात रात्रीच्या लोडशेडिंग बाबत आणि लाईट बिल सोबत पुन्हा मीटरचे डिपॉझिट घेण्याबाबत नगर शहर शिवसेना युवासेनेच्या वतीने एमएससीबी अधिकारी यांना घेराव घालण्यात आला . रात्रीची लोडशेडिंग त्वरित बंद करावी अशी या वेळेस मागणी करण्यात आली आणि जर लवकरात लवकर यावर विचार न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी देण्यात आला .

 यावेळी माजी शहरप्रमुख दिलीप दादा सातपुते, युवासेना सहसचिव विक्रम अनिलभैय्या राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, महिला आघाडीचे स्मिता अष्टेकर ताई, आकाश कातोरे, अरुण झेंडे, अभिषेक भोसले, मुन्ना भिंगारदिवे, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे उपस्थित होते.
close