shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिद्द चिकाटीच्या जोरावर अक्षय तागड याने मिळवले सुवर्णपदक समाजामध्ये आनंदोत्सव..!

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ३-४-२०२२
दिघोळ तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी कुटुंबातील धनगर समाजाचे अक्षय हनुमान तागड याने राजस्थान (जयपुर) मध्ये 13 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पोर्ट अथेलेटिक स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर रनिंग मध्ये व दिल्लीमध्ये 27 मार्च ला झालेल्या राष्ट्रीय स्पोर्ट अथेलेतिक स्पर्धेमध्ये दहा किलोमीटर रनिंग मध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व मे महिन्यात नेपाळ व (इंडो) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट अथलेटिक स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल चिरंजीव अक्षय हनुमान तागड यांच्या निवडीबद्दल आज दिघोळ येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. प्रकाश भैय्या सोनसळे यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की उंच भरारी घेण्यासाठी जिद्द चिकाटी ची गरज आहे आज अक्षय तागड याने जिद्द चिकाटी करून सुवर्णपदक हे तुमच्या गावाला मिळून देऊन एक समाजामध्ये व नगर जिल्ह्यामध्ये एक नाव रोषित केले असेच आपल्या या गावातून अनेक विद्यार्थी स्पर्धेमध्ये यशस्वी झाले पाहिजेत आणि या डिघोळ गावचे नाव महाराष्ट्रामध्ये चर्चेत आले पाहिजे आज गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक व सत्कार केला सर्वांनी शुभेच्छा वर्षाव केला यातून नक्कीच अक्षय तागड हा पुढच्या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरेल हीच अक्षय तागड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ..

यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य, डिघोळ गावचे सरपंच, पारगाव घुमरा येथील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यातील सर्व, राजकीय क्षेत्रातील सर्व, पत्रकारबांधव,सगेसोयरे,  माता-भगिनी दिघोळ ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीमध्ये ही मिरवणूक हा नागरी सत्कार संपन्न झाला.
close