shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवासेनेच्या वतीने इंदापूर येथे वाढत्या महागाई बद्दल भव्य थाळी बजाव आंदोलन.

युवा सेनेच्या वतीने इंदापूर येथे वाढत्या महागाई बद्दल भव्य थाळी बजाव आंदोलन. 

इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकारचे अभिनंदन करणारे निवेदन पत्र - दिले इंदापूर तहसीलदार यांना .

इंदापूर प्रतिनिधी:युवासेना इंदापुर तालुका व शहराच्या वतीने इंदापूर येथे वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून
भव्य थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
आज दिनांक ०३ एप्रिल २०२२ रोजी युवासेना सचिव  वरुन सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेना इंदापुर तालुका व शहराच्या वतीने इंदापूर निवासी नायब तहसीलदार ठोंबरे  यांना वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याबाबत निवेदन देऊन युवासेना जिल्हा सरचिटणीस  सुरज सानप यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना उपजिल्हा प्रमुख  कुलदीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगरपरिषद कार्यालयासमोर बाजार तळ मध्ये भव्य थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. 
सदर आंदोलनासाठी शिवसेना जिल्हा समन्वयक  शरदचंद्र  सुर्यवंशी,युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप,  युवासेना उपजिल्हा युवाधिकारी कुलदीप निंबाळकर, तालुका युवा आधिकारी सचिन इंगळे, युवासेना इंदापूर शहर युवाधिकारी श्रीधर खंडाळे, तालुका प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र हांगे,शहर प्रसिद्धी प्रमुख प्रदिप नामदास,तालुका समन्वयक नवनाथ सुतार,उपतालुका युवाधिकारी दिपक हगारे, उपतालूका युवाधिकारी वैभव कुदळे,गोरख ढोले,उमेश डोंगरे शिवसेना पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक युवासैनिक मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते . 
सदर आंदोलन इंदापूर युवा सेनेच्या वतीने आयोजन केले.सदर आंदोलनास युवासेना शहरप्रमुख अविनाश खंडाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच सुत्रसंचालन युवासेना समन्वयक नवनाथ सुतार यांनी केले.
close