राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ३-४-२०२२
शिंगवे नाईक :- नगर शिर्डी हायवे लगत असलेले श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट. शिंगवे नाईक, तालुका नगर,जिल्हा अहमदनगर,येथील शिंगवे व पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळविण्यात अंत्यत आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 02 एप्रिल 2022 ते 11 एप्रिल 2022 पर्यंत ज्ञानयज्ञ सोहळा,व अखंड हरिनाम सप्ताह, आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा. व आपले जीवन सार्थक करावे.अशी नम्रतेची विनंती श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळ, समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे श्रीराम जन्मोत्सव या उत्सवाला तब्बल 250 वर्ष पूर्ण होत आहे..याचे औचित्य साधून मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नुकतेच मंदिराचे आकर्षक रंगकाम देखील करण्यात आले आहे..........
तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती......
कार्यवाहक तथा सचिव. अमोल रमेश डोळस. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट.

