राहुरी । प्रतिनिधी:-
सालाबादप्रमाणे यंदाही संत शिरोमणी सावता महाराज चंदन उटी सोहळ्यानिमित्त आयोजित चांदा ते आरण भव्य चारचाकी दिंडी सोहळ्याचे स्वागत नगर येथे करण्यात आले.
उन्हाळ्यात वणवा सहन व्हावा म्हणून संत सावता महाराज संजिवन समाधीला वंदन लेप करण्यासाठी महाराष्ट्रभरातुन भाविक सहभागी होतात
या चंदन उटी चार चाकी दिंडी सोहळ्याचे नगर मध्ये स्वागत करण्यात आले या प्रसंगी गोरे डेंटल हॉस्पिटल चे संचालक डॉ सुदर्शन गोरे ,श्री संत सावता माळी युवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक तुपे,श सोशल मेडिया राज्यप्रमुख श्री दिपक साखरे ,उद्योजक श्री स्वप्नील राऊत आदी उपस्थित होते .
या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

