शिर्डी । प्रतिनिधी : ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने डिजिटल मेंबरशिप नोंदणी अभियान शिर्डी शहरात जोमाने सुरू असुन आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिर्डी येथे कार्येकर्तांना भेट देत सदस्य नोंदणी संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले..
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले,शिर्डी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद शेळके,युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमृत गायके,शहर उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश आरणे,सुवर्णा साबळे,निलेश डांगे,मच्छिन्द्र गुंजाळ, आरबाज कादरी,अक्षय शिंदे, योहान गायकवाड,साई गोरे आदीसह कार्येकर्ते उपस्थित होते.

