shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू...,!

शिर्डी ।  प्रतिनिधी :-
श्री साईबाबा रामनवमी उत्सव २०२२ या वर्षात शिर्डी शहरात श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ एप्रिल ते १३ एप्रीलपर्यत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता भव्य अशा मानाच्या साईकेसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचे जेष्ठ ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान यंदा शिर्डीत श्री साईबाबा विश्वस्त मंडळ तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मानाच्या साईकेसरी कुस्ती स्पर्धेचे मंगळवारी सायंकाळी शिर्डीतील जेष्ठ ग्रामस्थांच्या वतीने विधीवत पूजा करुन या मैदानाचे उद्घाटन थाटामाटात पार पडले.


याप्रसंगी हिरामण वारुळे, देवरामभाऊ सजन बाळासाहेब लुटे, विजय कोते,विश्वस्त महेंद्र शेळके, किशोर गंगवाल, देवानंद शेजवळ, रज्जाकभाई शेख, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब नागरे,रावसाहेब आरणे, भाऊसाहेब झरेकर, प्रकाश शिंदे, रवींद्र बर्डे, दादाभाऊ गोंदकर, उत्तम कोते, राजेंद्र कोते, दिनूमामा कोते, मंगेश त्रिभूवन,दत्तात्रय कोते, श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते,कार्याध्यक्ष जगन्नाथ गोंदकर,नितीन कोते, कुस्ती कमीटीचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर, उपाध्यक्ष अरविंद कोते, ताराचंद कोते,रवींद्र कोते, निलेश कोते,शिर्डी युवा ग्रामस्थ तसेच छत्रपती शासन चे सर्व कार्यकर्ते आदीसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जेष्ठ ग्रामस्थ हिरामण नाना वारुळे यांनी यंदाच्या रामनवमी उत्सवात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक करत ब-याच वर्षानंतर प्रथमच रामनवमी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी प्रथमच उत्साही आणी सर्वसमावेशक असा अध्यक्ष कमलाकर कोते यांच्या रुपाने लाभले असल्याचे त्यांनी सांगत त्यांचेही आभार मानले.

यावेळी अध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले की, साईबाबांच्या काळापासून कुस्तीची परंपरा कायम राहिली असून हा उत्सव गांवातील सर्व समाजातील लोकांचा आहे, त्यामुळे आपल्याला हि यात्रा सर्वांना बरोबर घेऊन पार पाडायची आहे.बाबांनी श्रद्धा आणी सबुरीचा संदेश दिला आहे.साई संस्थानने यंदा यात्रा कमिटीला २१ लाख रुपये दिले. हा देखील स्वागतार्ह निर्णय असून उपस्थित सर्वाचे आभार मानले.
close