shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संकटसमयी आपण सर्वजण हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहात याचा अभिमान वाटतो - राजवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांबद्दल पोस्ट द्वारे केले आपले मत व्यक्त.

संकटसमयी आपण सर्वजण हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहात याचा अभिमान वाटतो - राजवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांबद्दल पोस्ट द्वारे केले आपले मत व्यक्त.
इंदापूर प्रतिनिधी: संकटसमयी आपण सर्वजण हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहात याचा अभिमान वाटतो.अशा शब्दात निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी पोस्ट करीत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दिनांक ३१ मार्च रोजी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पाटील यांच्यावर असणारे प्रेम व साथ व्यक्त करून दाखवली याची दखल घेऊन राजवर्धन पाटील यांनी आपल्या पोस्ट मधून आपली भावना व्यक्त केली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात आज सोशल मीडियावर ते आदरणीय साहेब यांच्याबद्दल अनेक पोस्ट पाहिल्या  आदरणीय साहेब यांच्या बद्दल आपण ज्या काही भावना व्यक्त करत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार . आदरणीय साहेब यांनी दैनंदिन राजकीय सामाजिक शैक्षणिक कामे करत असताना आम्हा कुटुंबीयांना जास्त वेळ देता आला नाही याची खंत अनेक वेळा वाटते परंतु आज संकटसमयी आपण सर्वजण आदरणीय साहेबा सोबत खंबीरपणे उभा आहात याचा अभिमान वाटतो ज्या व्यक्तीने संपूर्ण तालुका हा आपला परिवार आहे याप्रमाणे सर्वांचा विचार केला सर्वांची काळजी घेतली त्याकरिता आपण सर्वांनी एकत्रित येत खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहात आपण अनेक संकटांना त्यांच्यासमवेत तोंड दिले खंबीरपणे सर्व सुखदुःखात त्यांच्यासमवेत उभा राहिला त्याबद्दल शब्दांमध्ये आपले आभार व्यक्त करणे अतिशय कठीण आहे असेच प्रेम अशीच साथ सदैव राहो ही सदिच्छा पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार अशा शब्दात पोस्ट द्वारे त्यांनी आपले मत व्यक्त केले. ज्या व्यक्तीने संपूर्ण तालुका हा आपला परिवार आहे याप्रमाणे सर्वांचा विचार केला सर्वांची काळजी घेतली त्याकरिता आपण सर्वांनी एकत्रित येत खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहात आपण अनेक संकटांना त्यांच्यासमवेत तोंड दिले खंबीरपणे सर्व सुखदुःखात त्यांच्यासमवेत उभा राहिला त्याबद्दल शब्दांमध्ये आपले आभार व्यक्त करणे अतिशय कठीण आहे असेच प्रेम अशीच साथ सदैव राहो ही सदिच्छा पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार अशा शब्दात पोस्ट द्वारे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
close