इंदापूर शहरातील विकास कामांना १० कोटी ४५ लक्ष निधी मंजूर :-- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरामधील नागरिकांची रस्ते ड्रेनेज तसेच सुशोभीकरण आदी कामांबद्दल सतत ची मागणी होत होती. या मागणीचा विचार करता दलित वस्ती तसेच दलितेतर व नगरोत्थान या निधीअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकास कामांना सुमारे १० कोटी ४५ लक्ष इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली .इंदापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ,साठेनगर व लोकमान्य नगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कॉंक्रीट रस्ते या कामाकरता २ कोटी १० लक्ष निधी व नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत डॉ आंबेडकर नगर साठेनगर व लोकमान्य नगर येथे अंडरग्राउंड ड्रेनेज करिता ६८ लक्ष ९९ हजार तसेच प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत बावडा वेस येथील श्री संत सावतामाळी मंदिरासमोर समाज मंदिर बांधणे या कामाकरिता १ कोटी १४ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच इंदापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत इंदापूर शहरातील एकूण ४१ कामांना ६ कोटी ६२ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे इंदापूर शहरातील बऱ्याच काळ प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांची तसेच ड्रेनेजची तसेच सुशोभीकरणाची कामे अत्यंत गतीने होणार आहे यामुळे शहराच्या विकासात भर पडणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

