श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) :- सिमेवर लढताना आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेली सेवा अमूल्य आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे,असे प्रतिपादन श्रीरामपूरचे आमदार लहूजी कानडे यांनी केले.
येथील बेलापूररोडवरील अनमोल रसवंती गृह येथे जय हिंद अकॅडमीच्यावतीने तालुक्यातील नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, याप्रसंगी नायब सुभेदार राजमोहंमद शेख व मेजर संजय भोसले यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला.भारतीय जवानांच्या सेवेची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यासाठी शहरातील कर्मवीर चौक येथील जय हिंद अकॅडमीच्यावतीने वेळोवेळी जवानांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने सदरच्या कार्यक्रमात बोलतांना आ.लहू कानडे म्हणाले की, वीर जवानांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांचे देशासाठीचे योगदान सर्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी असे सैनिक सन्मानाचे कार्यक्रम समाजाने आयोजित करणे आवश्यक आहे. यासाठी जयहिंद अकॅडमीचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगामध्ये देशसेवे इतके पवित्र कार्य दुसरे कोणतेच नाही,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन तालुक्यात मोठे क्रिडा संकुल तयार करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या वर्षाअखेर ते काम पूर्ण करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. तालुक्यातील भावी जवानांना याचा निश्चितच फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.सदरच्या कार्यक्रमात मेजर किशोर कापसे,रवींद्र कुलकर्णी या सेवानिवृत्त जवानांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जय हिंद चे संचालक सुयोग सस्कर यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ,अजय बत्तीशे व आभार बाळासाहेब वाणी यांनी व्यक्त केले.
प्रसंगी बाबूलाल शेख, अशोकचे संचालक हिम्मतराव धुमाळ, विजय भोसले, मुकुंद इंगळे, मौलाना इम्त्याजअली,अशोक भोसले,भारत तुपे,आयुब शेख, अकबर शेख, इस्माईल शेख, प्रमोद भोसले, शिवाजी भोसले, किरण गायधने,नूर शेख, स्वरांजली आर्केस्ट्राच्या संचालिका अंजली पांगरे पुणे, कानडे सर औरंगाबाद, कॉ. जीवन सुरुडे,शरीफभाई शेख, ऍड.समीन बागवान,नईम शेख, शब्बीर शेख, इमरान शेख, त्रिदल सैनिक संघाचे मेजर कृष्णा सरदार,अनिल लगड, सुनील गवळी, दिलीप तांबे, कैलास कोठुळे,सुनील भालेराव,संतोष देवराई,शबाना शेख, खातूनबी शेख,अंजली भोसले, श्रीमती पद्मावती भोसले, माधुरी भोसले, रंजनी इंगळे, कविता पांडव, सविता सस्कर यांची उपस्थिती होती.सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल बहिरे,करणं वंजारी, मिनींनाथ गायकवाड,ऋषी आगळे,ऋषी बारशे,अजय वायकर,विकास पोलादे,प्राजक्ता हडके,गायत्री सावंत,मानसी रजपूत,पल्लवी कांबळे आदींनी परीश्रम घेतले.

