2 एप्रिल 2022 रोजी गुढीपाडवा आहे. या दिवशी घरोघरी गुढ्या आणि तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात चैत्र शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी ज्या दिवशी असते तो वर्षाचा नवीन दिवस म्हणून स्वागत करतात. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून या दिवशी पंचांग पूजन ही करतात. गुढीपूजनासाठी कोणताही विधी नाही गुढी उभी करणे हे मंगलतेचे प्रतीक आहे. त्यासाठी मंगलमय वातावरणात खालील प्रमाणे करावे.
गुढी उभी करण्यासाठी जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावी त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एक स्वच्छ भांडे ठेवावे गुढीला कडुलिंबाची पाने, आंबा डहाळी, साखरेची माळ घालावी हळद, कुंकुम, फुले वाहावी आणि पूजन करून नवीन वर्ष आरोग्यदायी आनंदी, समृद्धीदायक जावे अशी प्रार्थना करावी ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील प्रमाणे प्रार्थना करावी.
‐----------------------------------------
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु ।।
♦️ अर्थ - सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि उत्तम फल देणाऱ्या ब्रह्मध्वजास नमस्कार असो नवीन वर्षात माझ्या घरात कायमच मंगलमयता असू द्यावी..
----------------------------------------
त्यानंतर पंचाग पूजन नवीन वर्षफळ पंचांगातून वाचावे गोड अन्नाचा नैवेद्य करून भोजन करावे गुढी नमस्कार करून सूर्यास्त समयी उतरून ठेवावी. यावर्षी शुभकृत नावाचे संवत्सर आहे. गुढीपूजन जे मंगलतेचे प्रतीक आहे ते उपलब्ध होतील त्या वस्तूसह जरूर करावे. आपले इष्टमित्र तसेच कुटुंबीय आणि राष्ट्र सुख शांती समृध्दीमय होणेची प्रार्थना करावी.
🕉️ गुढी पाडवा हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
------------------------------------------
आमच्याकडे सत्यनारायण महापूजा, वास्तुशांती, नक्षत्र शांती, जननशांती, कालसर्प शांती तसेच इतर धार्मिक कार्य केले जातील.
---‐------------------------------------
मु. पो. देहरे (ADCC बँक शेजारी)
ता. जि. अहमदनगर.
----‐-----------------------------------
श्री बळीराम चंद्रकांत पाठक देवा 7821838990,
चि. सागर बळीराम पाठक. 8208045709
Google Pay / Phone pay no.- 9762662097.

