राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त बावडा येथे गरजू महिलांना साड्या वाटप.
बावडा वडार समाज संघटनेच्या वतीने हनुमान जयंती साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: सालाबाद प्रमाणे यावर्षी बावडा येथे वडार समाज संघटनेच्या वतीने हनुमान जयंती उत्सवा निमित्त पवनपुत्र हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या करण्यात आले. यानंतर गरजू महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील ,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, नवनाथ रुपनवर,विजय घोगरे, संजय सोनवणे ,अनिल पवार ,सुरेश शिंदे, अजित टिळेकर, शितल कांबळे, नागेश गायकवाड यांच्यासह इतर ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की बावडा येथील वडार समाजासाठी समाज मंदिरासाठी लागेल तो निधी दिला जाईल. आज हनुमान जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मधुकर चव्हाण यांनी केले.

