संगमनेर । प्रतिनिधी :-
खडकवाडी, ता.पारनेर येथील सौ.भिमाबाई रेवजी शिंगोटे यांचे वृद्धापकाळाने बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.अत्यंत कष्टाळू,प्रेमळ आणि शिस्तप्रिय स्वभावाच्या मातेच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांना कीर्तन,प्रवचन, भजन यांची विशेष आवड होती.जात्यावरच्या ओव्या,विवाह प्रसंगी पारंपरिक लोकगीते गाण्याची त्यांची ख्याती होती.दारावर आलेल्या वाटसरूला त्यांनी कधीही विन्मुख जाऊ दिले नाही.स्वयंपाक करण्याची आणि भुकेलेल्यास तृप्त करण्याची विलक्षण हौस त्यांना होती.त्यांच्या हातच्या जेवणाला वेगळीच खुमारी असे.देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती.
त्यांच्या जाण्याने त्यांचे पती ,संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.रेवजी नाना शिंगोटे यांचे सांत्वन होत आहे. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष, जिल्हा आदर्श शिक्षक, सह्याद्रीभूषण, शिक्षक रत्न, राजर्षी शाहू महाराज यशवंत गौरव,संत गाडगेबाबा समाजसेवक इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित शिवव्याख्याते, प्रबोधनकार श्री.बाळासाहेब शिंगोटे सर यांच्या त्या मातोश्री होत्या!!
आई पुन्हा या...!!!
१९८३ साली मी तिसरीत असताना माझा भाऊ पाण्यात बुडुन मृत्यू झाला. तेव्हा तो सहावीत होता.
२००७ साली माझी बहिणीचे निधन झाले. हेत्या धक्क्यातून ती शेवटपर्यंत सावरली नाही.मी नोकरीला लागायच्या अगोदर आई-वडिलांनी खूप गरिबीत दिवस काढले.
तीनही मुलींच्या कायम प्रापंचिक कटकटी चालू असत.
मी नववीत असताना सहकारी सोसायटी वाल्यानी आमच्या घरावर जप्ती आणली होती.तेव्हा आम्ही कोपीत रहात होतो.जप्त करण्यासाठी काहीच नव्हते!
१९९० ला मी दहावी सुटलो तेव्हा माझ्या कानाचे ऑपरेशन झाले.तेव्हा २-३ दिवस हिंडून सुद्धा वडिलांना कुणी ५०० रुपये दिले नाही.तेव्हा आईचे दागिने गहाण ठेवून वाणीन बाईने ५०० रुपये दिले.तिथून पुढे ३-४ वर्षे तिच्या गळ्यात फक्त काळ्या मण्यांची पोत होती.
-श्री.बाळासाहेब शिंगोटेसर(मुलगा)
पारनेर तालुका अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघ
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, मायेच्या अथांग सागरास भावपुर्ण आदरांजली...!
स्व.भिमाबाई रेवजी शिंगोटे यांचे व्रुद्धापकाळाने दुखःद असे निधन झाले. अतिशय खडतर परिश्रमाने परिस्थितीशी लढा देत येणाऱ्या प्रत्येक संकटात ह.भ.प.रेवजी नाना शिंगोटे यांच्या बरोबरीने लढण्याचे काम, कौटुंबिक जबाबदारी बरोबरच समाजातील प्रत्येक घटकाबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा याद्वारे खडकवाडी आणि परिसरातील नागरिक तसेच नातेवाईकांमधील एक हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व हरपले.
-शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील,
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩
दशक्रिया विधी, शुक्रवार दि.२२/०४/२०२२ रोजी सकाळी ०८.००वाजता खडकवाडी,ता.पारनेर याठिकाणी होईल.
दशक्रिया विधीनिमीत्त ह.भ.प.कान्होपात्राताई सोमासे(साईकुटीया आश्रम,आश्वी) याचे प्रवचन होईल..!

