शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२
खडांबे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उज्वला प्रभाकर हरिश्चंद्रे यांची बिनवरोध निवड..!!
राहुरी : तालुक्यातील खडांबे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी उज्वला प्रभाकर हरिश्चंद्रे यांच्यी बिनविरोध निवड झाली पदाच्या माध्यमातून राहिलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही उपसरपंच उज्ज्वला हरिश्चंद्रे यांनी दिली.
खडांबे खुर्द येथील ग्रामपंचायतची निवडणुक झाल्यानंतर उपसरपंच पद हे रोटेशन पद्धतीने ठरलेले असल्याने उज्वला प्रभाकर हरिश्चंद्रे यांना उपसरपंच पदाचा कार्यभार मिळाला असुन त्यांची बिनिरोध निवड घोषित झाल्यानंतर पदाच्या माध्यमातुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच कानिफनाथ कल्हापुरे ग्रामपंचायत सदस्य अनिता कल्हापुरे अनिता पवार गणेश पारे सुरेखा खळेकर हिराबाई नन्नवरे मा.उपसरपंच प्रभाकर हरिश्चंद्रे भरत पवार संजय कल्हापुरे अर्जुन खळेकर उत्तम कल्हापुरे मयूर हरिश्चंद्रे बाळासाहेब कल्हापुरे संजय हरिश्चंद्रे मकरंद कारले शंकर कारले बाळासाहेब साळे जनू मकासरे नाना कदम नाना दुधाडे मार्कस पवार ग्रामसेवक रामदास कार्ले आदी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

