श्रीरामपूर (प्रतिनिधी) :- शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या ऊस परिषदेसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात ऍड.अजितराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली,सदर बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,संपर्क प्रमुख शिवाजी जवरे,युवा आघाडी प्रमुख बच्चू मोढवे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, नेवासा तालुकाध्यक्ष हरिभाऊ तुवर,भास्कर तुवर,संदीप उघडे, विलास कदम,बाळासाहेब शिरसाठ, गोविंदराव वाघ, सुदामराव औताडे, ऍड.सर्जेराव घोडे, विष्णुपंत खंडागळे,किशोर पाटील,छावाचे नितीन पटारे, कैलास पवार,संजय वमने,शरद पवार,बबन उघडे, प्रभाशंकर तुवर,मनोहर मटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यासह जिल्ह्यात उपस्थित झालेल्या अतिरिक्त ऊसाच्या अनुषंगाने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे दुपारी ठीक १ :०० वा. आयोजित ऊस परिषदेमध्ये खालील मागण्याचा विचार होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने १) दोन साखर कारखान्यांसह दोन इथेनॉल कारखान्यांमधील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट रद्द व्हावी.
२) स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची रुपये दहा रुपयांची कपात ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बिळातून रद्द करावी,३) उशिरा तुटलेल्या ऊसाला एकरी २५ हजार रुपये व गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, ४) विज बिल, पाणीपट्टीसह संपूर्ण कर्जमाफी मिळावी आदी मागण्यांबाबत परिषदेमध्ये विचार होणार आहे. तरी ऊस परिषदेसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मान. रघुनाथ दादा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य परिषद होणार आहे. तरी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हानही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
अशोक सहकारी साखर कारखाने गाळप क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उसाच्या नोंदी घेतल्या तसेच कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणल्याने कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी चा प्रोग्रॅम पूर्णतः कोलमडला आहे त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांच्या उसाच्या होत असून ऊस तोड मजुरांकडून देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली जात आहे मात्र यावर व्यवस्थापन काहीही बोलण्यास तयार नाही व्यवस्थापनाने पूर्णपणे हात झटकले असून शेतकऱ्यांच्या घामाचा अनादर अशोक कारखान्याकडून केला जात आहे तसेच कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तसेच बाहेरील कारखान्याने अशोक चा ऊस नेण्यासाठी असमर्थता दाखवल्याने कार्यक्षेत्रातील ऊस तुटणार किंवा नाही याची भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे तसेच उशिरा ऊस तुटल्याने मोठ्या प्रमाणात उसाच्या वजनामध्ये घट होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे बसत आहे.
अनिल औताडे.
जिल्हाध्यक्ष अ.नगर )

