shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदूसाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे देशातील पहिले मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय.

      हिंदूसाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे पहिले मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू साठी हिंदू कोड बिल कायदामंत्री म्हणून मांडले. काँग्रेस सरकार व पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ते पास होऊ दिले नाही. त्या रागातून काँग्रेस ने दोन वेळा त्यांचा लोकसभेत पराभव केला. त्यामुळे बुद्धिमान व्यक्तिमत्त्व असणारे बाबासाहेब यांचे निर्वाण झाले. असे मत भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.

          कळस बु ता अकोले येथे संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच राजेंद्र गवांदे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, दिलीप ढगे तर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सूर्यकांत ढगे, निवृत्ती मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता युवा मोर्चा चे तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ हे होते.
              श्री. वाकचौरे बोलताना पुढे म्हणाले की, भारत देशाची जागतिक महासत्ता होण्याचे दृष्टीने वाटचाल चालू आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे यश आहे. आज जग वेगळ्या उंबरठ्यावर असून आपले देशाच्या शेजारी असणारे पाकिस्तान मध्ये  अराजकता असून श्रीलंका अन नेपाळमध्ये आर्थिक संकट ओढवले आहे. अफगाणिस्तान तालिबानी राजवट आली आहे. रशियाचे विघटन झाले. अमेरिका भारताशी संबंध मधुर ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. हे सर्व राज्यघटना लिहिताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी कलमे लिहिली, जे अधिकार दिले त्याच वेळी कर्तव्य हि सांगितले आहे. राज्यांना अन केंद्राचे अधिकार वेगळे ठेवले त्यामुळेच जागतिक महासत्ता होईल.

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटना लिहिताना छत्रपती शिवराय यांचे विचार अन त्यांच्या नीतीचा वापर केला. छत्रपती यांची राजकीय, धार्मिक, युद्ध, परकीय, नीतीचा अंगीकार घटना लिहिताना वापरली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात जन्म घेतला तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली मात्र कोणत्याही हिंदू धर्मगुरू किंवा पुढारी यांनी त्यांची समजूत अथवा मनधरणी केली नाही अशी खंत व्यक्त केली मात्र त्यावेळी मुस्लिम व ख्रिश्चन धर्मगुरू यांनी आपले धर्मात घेण्यासाठी अनेक प्रलोभने आमिष दाखवले तरी बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या जवळील बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असेही मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र वर गीते सादर केले.

         यावेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन अनिल गावांदे यांनी तर आभार उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी मानले. जिप शाळेच्या विद्यार्थी यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाकचौरे,  डी टि वाकचौरे, रामनाथ गवांदे, श्याम गवांदे, अशोक वाकचौरे, निलेश बिबवे, सुनील ढगे, संजय नवले, उल्हास कातोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
close