राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १५-४-२०२२
येथील चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षण महर्षी राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित...चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूर,परिवर्तन फाउंडेशन श्रीरामपूर आणि माजी सैनिक त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सकाळी ७:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समता रथाची मिरवणूक काढण्यात आली,ही मिरवणूक संभाजीनगर (कांदा मार्केट परिसर मार्गे) नेवासा-श्रीरामपूर रोडवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ प्रथमतः मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.सदर मिरवणूक अतिशय शांततामय वातावरणात तसेच सामाजिक संदेश यासह काढण्यात आली, तद्नंतर सामाजिक कार्यक्रमाचे नामदेवराव नंन्नवरे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक उपक्रम घेणेत आला, सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तसेच संविधान प्रास्तविका सामूहिक वाचन करून करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील अनेक ठिकाणाहून विद्यार्थी उपस्थित होते तसेच पालकांसह विविध क्षेत्रातील समाज बांधव उपस्थित होते,या कार्यक्रमामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचरित्रावर आधारित शालेय विद्यार्थ्यांनी पोवाडे,विचारधारा भाषणे,गिते अत्यंत सुंदर अशा रीतीने मांडण्यात आले,त्यांच्या या वकृत्वशैलीवर खुश होऊन सन्माननीय विचारमंच आणि पालकांनी त्यांना भरघोस असे रोख स्वरूपात बक्षिसेही दिलीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका-संघटित व्हा -संघर्ष करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ब्रीदवाक्यास साथीला घेऊन चर्मकार संघर्ष समिती, परिवर्तन फाऊंडेशन,माजी सैनिक त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच शालेय स्तरावरील मुलांना येणाऱ्या अडचणी, भविष्यात दहावी आणि बारावी नंतर येणाऱ्या अडचणी या विषयी समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे ॲड.मोहसिन शौकत शेख यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले,या ठिकाणी निव्वळ हार,तुरे घालून जयंती साजरी न करता महामानवांनी समाजाविषयी दिलेली विचारधारा व उपदेश यावर आधारित जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
समाजात अजून उपेक्षित घटक असून शिक्षण नाही,अंधश्रद्धा आहे,आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, या सर्व परिस्थितीचा विचार करून यापुढील काळात समिती हुशार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी तसेच दहावी-बारावीनंतर विविध प्रकारचे व्यावसायिक व नोकरी विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण आयोजित करणार आहे. यासाठी सर्व समाजाने समाजातील प्रत्येक घटकासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी पुढे यावे असे अनेक प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले, आपण सर्व प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहोत हे सर्वांनी प्रथमता ध्यानात घ्यावे, महापुरुषांचे कार्य संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि त्यांचे जे अपुर्ण राहिलेले स्वप्न ते पूर्ण करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.असेही आपल्या मनोगतातून सर्व मान्यवरांनी विचार प्रगट केले. या कार्यक्रमास मेजर कृष्णा सरदार, भिमराज खंडीझोड,उत्तमराव गणपतराव दाभाडे,रामचंद्र वीरप्पा सुगुर,गोरखराव आढाव, रमेश हिरामण अंभोरे,अनिल लगड,संग्राम यादव,रवींद्र कुलकर्णी,राम म्हैस,विलास खर्डे, सुनील भालेराव,तसेच माजी सैनिक त्रिदल सेवा संघ,परिवर्तन फौंडेशन,सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शकील बागवान (सर) यांनी मुलांसाठी उजळणी व शैक्षणिक साहित्य भेट दिले,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,कु.पद्मा राजपाल अपघड व्याख्याता, शिवाजीराव गांगुर्डे,डॅनियल देठे सामाजिक कार्यकर्ते, सुरेशराव भडांगे रामपूर ग्रामपंचायत आदर्श सरपंच ,डॉ. राजाराम नारायण राशिनकर नायगांव ग्रामपंचायत आदर्श सरपंच ,दुधाळे गुरुजी, रविशेठ खिल्लारी सामाजिक कार्यकर्ते , ॲड विजयराव खाजेकर ,सौ.प्राचार्या खाजेकर ॲड.मोहसिन शेख, संतोष वाघमोडे सर,शाकीर शेख आणि शेख मॅडम, मेघा नन्नवरे मॅडम,सौ लता नवघरे मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या आदेशान्वये समितीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संजय दळवी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन , जिल्हा संघटक दिलीप शेंडे,सौ. सुनंदा शेंडे मॅडम, प्रेमचंद वाघमारे, सौ.सोनल वाघमारे मॅडम,नामदेव नन्नवरे, सौ.इंदुताई नन्नवरे मॅडम,नामदेव कानडे,सौ.मनिषा कानडे मॅडम, अशोक खैरे सर व सौ.मोहिनी खैरे मॅडम,सौ.आशाताई दळवी मॅडम, रामनाथ सोनवणे,सौ संगीता सोनवणे,जगन्नाथ हरिभाऊ तेलोरे,विठ्ठल शेंडे,
सतिश शेंडे, सौ.भाग्यश्री शेंडे,अमोल नन्नवरे,सौ.संगीता क्षिरीसागर मॅडम,सुभाषराव पोटे, सिद्धार्थ शेंडे,धनंजय शेंडे,सुरज बनकर,साक्षी वाघमारे,श्वेता वाघमारे,श्रावस्ती वाघमारे,सुजल दळवी,लोकेश दळवी,युवा चर्मकार संघर्ष समिती श्रीरामपूर, समता सैनिक दल श्रीरामपूर शाखा,यासह चर्मकार संघर्ष समिती सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन सुव्यवस्थितरित्या पार पाडले. शेवटी दिलिप शेंडे यांनी आभार मानले.

