shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम घेत भीम सैनिकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव..! बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी केली मात्र शिर्डी शहरात यावर्षी जयंती निमित्त वेगळ्या प्रकारचे समाधानकारक दृश्य पहावयास मिळाल्याने अनेकांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय..

या महामानवाला वंदन करण्यासाठी भीमनगर सह शिर्डीतील विविध उपनगरांमधील सर्व समाजबांधवांना एकत्र करत एकच ठिकाणी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने एक जयंती एक मिरवणूक एकत्र समाज असा आगळा वेगळा नजारा आज शिर्डीतील जयंती निमित्त दिसून आला.या जयंती साठी शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते,सर्व समाजातील मान्यवरांनी हजेरी लावत साई बाबांच्या पावन भूमीत आम्ही सर्व एक आहोत असा साईंच्या सबका मलिक एक या संदेशाचे जयंती निमित्त तंतोतंत पालन झाल्याचे दिसून आले

सकाळी शिर्डी नगरपरिषद मध्ये महामानवाला मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात आली त्यानंतर साई आश्रया अनाथालयात अनाथ मुलांना ॲड.अनिल शेजवळ आणि ॲड.अविनाश शेजवळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जात फळे वाटप करण्यात आली यावेळी रासपा चे नानासाहेब काटकर,अप्पासाहेब गायकवाड,नानासाहेब शेजवळ,संदीप शेजवळ,रवींद्र शेजवळ,आकाश शेजवळ उपस्थित होते.

भीमनगर येथील समाज मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला  व सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रेचे सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील या उपस्थित होत्या 

अनेक नेत्यांनी वक्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित त्यांच्या कार्याचा गौरव करत भाषणे करत या महामानवाच्या जयंती निमित्त अभिवादन केले
close