राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि.१३-४-२०२२
वीज वितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाले बाबत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे आंदोलन चालू केले. या आंदोलनाला भूमि अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आरिफभाई शेख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
तसेच ज्येष्ठ कामगार नेते आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय .एन. एम. पवळे साहेब. जिल्हाध्यक्ष श्री. के.के. जाधव विभागीय अध्यक्ष श्री. ना.म.साठे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असुन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

