व्याहाळी शाळेत शाळापूर्व तयारी व प्रवेशोत्सव मेळावा मोठया जल्लोषात पडला पार
शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे जि प शाळांचा पट व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार...विजयकुमार परीट
(गटविकास अधिकारी)
ग्रामपंचायती च्या सहकार्याने सोलर विद्युत संच बसवणारी तालुक्यातील ही एकमेव पहिली शाळा.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक 13/04/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी या ठिकाणी शाळापूर्व तयारी व प्रवेशोत्सव प्रथम मेळावा अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. मेळाव्याची सुरुवात प्रभात फेरी ने झाली हलगीच्या निनादामध्ये इयत्ता पहिली या वर्गात दाखल होणारे विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. अगदी सकाळपासूनच सर्व पालक आपापल्या पाल्यांना घेऊन शाळा परिसरात उपस्थित होते.या वेळी 26 दाखलपात्र विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली . कार्यक्रमाची ग्रँड ओपनिंग झाली ती प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने. कार्यक्रमासाठी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे विस्ताराधिकारी सुनिल मुगळे उपस्थित झाले .गटविकासअधिकरी यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . महिला पालक,महिला शिक्षिका यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण केले त्यानंतर व्याहाळी ग्रामपंचायतीकडून शाळेस मिळालेल्या सोलार विद्युत संचाचे उद्घाटन करण्यत आले .मंचावर सर्व मान्यवर स्थानापन्न झाल्यावर गटविकास अधिकारी यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . प्रभाकर लावंड सरांनी यास अनुमोदन दिले.दिपप्रज्वलन करण्यासाठी अध्यक्षांना विनंती केली असता त्यांनी स्वतः दिपप्रज्वलन न करता नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन केले. त्यानंतर विद्यार्थिनींनी खूपच सुंदर असे स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी केले .सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी आपल्या भाषणात सर्व शिक्षकांचे आणि ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले . त्यांचे कौतुक शब्द
*तुम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे डीजे चा तालावर स्वागत केलयं . त्यामुळे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे . या मुलांना शाळेची गोडी लागली आहे आणि ही वर्षभर शाळेत आनंदानेच उपस्थित राहतील यात माझ्या मनात शंका नाही*
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गटविकास अधिकारी विजयकुमार परीट अध्यक्षीय भाषणासाठी उभे राहिले त्यांचे भाषण ऐकताना ते अधिकारी नाहीत तर इंदापूर तालुक्यातील सर्व शिक्षकांचे पालकत्व घेतलेले वडीलधारी वाटले . इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेतील शिक्षकांना विणाकारण त्रास देणाऱ्यास कडक शब्दात इशारा देऊन शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली . ती अशी
1) इतका सुंदर आणि दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन पाहून या कार्यक्रमाला कुणाची नजर ना लागो.
2)ग्रामपंचायती च्या सहकार्याने सोलर विद्युत संच बसवणारी तालुक्यातील ही एकमेव पहिली शाळा आहे.
3) मागच्या वेळी मी शाळेत भेट दिली होती .ती भेट आणि आत्ताची भेट यात मला खूप मोठा सकारात्मक बदल दिसून येतोय.
4) तालुका स्तरावर व्याहाळी शाळेचा फीडबॅक येतो त्यावेळेस सौ.मोनाली जौंजाळ मॅडम तुमचं नाव स्कॉलरशिप च्या तयारीसाठी आवर्जून इथले ग्रामस्थ देखील घेतात .त्या संदर्भात मी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे.
यावेळी साहेबांनी 'आभाळा चे खांब.' ही बोधकथा सांगितली.तिचा मतितार्थ असा होता की काही व्यक्ती कितीही त्रास झाला तरी ते चांगलं काम करण्याचं सोडत नाहीत आणि अगदी असेच आपल्या व्याहाळी शाळेतील शिक्षक आहेत त्यांना त्रास नक्कीच होतोय परंतु ते चांगलं काम करण्याचं सोडत नाहीत मी त्यांच्या पाठीशी नेहमीच असेन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष हेगडे यांनी केले.कार्यक्रमास व्याहाळी गावचे सरपंच श्री दादासाहेब पाटोळे ,उपसरपंच सौ.पूनम पवार, श्री कांतिलाल जाधव ,श्री दामोदर पवार श्री सोमनाथ तानपुरे ,सौ निर्मला मोरे सौ.सारिका दिवसे ,श्रीमती.साक्षी शिंदे व इतर सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ जयश्री मोरे उपाध्यक्षा सौ सुमित्रा पवार व सर्व सदस्य तसेच भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पद्माकर लावंड सर,विषय तज्ञ श्री तुकाराम पाडूळे सर उपस्थित होते.
शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने लावंड सरांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर मेळाव्याचा कार्यक्रम सुपर डूपर बनवण्यासाठी परिश्रम घेतलेले श्री प्रभाकर लावंड सर ,श्री चंद्रकांत रामाणे सर ,सौ.जयश्री मिसाळ मॅडम, सौ.मोनाली जौंजाळ मॅडम,सौ.गीतांजली जाधव मॅडम सौ.सुजाता कुदळे मॅडम,राजकुमार भोंग सर,अंगणवाडी सेविका सौ.मेघाताई मॅडम , सौ कविता दिवसे मॅडम,सौ संगिता मोरे, सौ सुजाता मॅडम

