नियम शिथिल झाले असले तरी कोरोना नियमांचे पालन करा - शिवांजली अकोलकर
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ६ / नगर येथील सावेडी भागातील ज्ञानसंपदा स्कूल (इंग्लिश मिडीयम) तपोवन रोड या विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहिम दि . ६ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत महानगर पालिकेच्या नागापूर आरोग्य विभागा मार्फत राबविली गेली. या लसीकरण मोहिमे अंतर्गत १०८ विद्यार्थांना कोवॅक्सीन या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. या कामी ज्येष्ठ परिचारिका नलिनी गवळी, श्रीदेवी बांगर , तसेच गिरीजा दाताळ , रेखा चांदणे, संगिता कावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली गेली.या लसीकरणास विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद कौतुकास्पद होता .
यावेळी मुख्याध्यापिका सौ . अकोलकर यांनी सांगितले की, कोरोना रोगापासून संरक्षणासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक असून कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल झाले असले तरी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करायला हवे .
लसीकरण पार पाडण्यासाठी वृषाली पटेकर, गणेश धोते , सोनाली पंडित , प्रसाद बर्वे, उज्वला पंडित या सर्व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले .
शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक वृंदाचे कौतुक केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

