shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशसेवा हि सर्वोत्तम सेवा आहे - गणेश करे-पाटील


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

  करमाळा: दि. ६/  देशसेवा हि आयुष्यातील सर्वोत्तम सेवा आहे. सैनिक आहेत म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत. म्हणून सैनिकाचे स्थान समाजातील सदैव मानाचे असते. सैनिकांची सेवापुर्ती झाल्यानंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होणे ही सैनिकांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन प्रा. गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते फिसरे येथील मेजर सुनील वसंत दौंडे यांनी भारतीय सैन्यदलात २१ वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले तसेच उमेश रोकडे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अभियंता पदावर निवडी बाबत भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने बोलत होते. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की फिसरे ग्रामस्थांचा हा उपक्रम अनुकरणीय असून इतरांनाही या सन्मानसोहळ्याने यश मिळवायला प्रेरणा मिळेल.

 सत्काराला उत्तर देताना मेजर सुनील दौंडे यांनी आपल्या आठवणीला उजाळा दिला, प्रतिकूल परिस्थितीतून शिकून देशसेवाच करायची हा ठाम निश्चय करूनच भालतीय सैन्यात भरती झालो, ३५ अंश सेल्सिअस तापमानात लेह, सियाचिन सारख्या प्रदेशात जाऊन कडा पहारा दिला. आज जन्मभूमीत परतलो आहे येथून पुढे सामाजिक क्षेत्रात कार्यरत रहाणार आहे. तत्पूर्वी फिसरे ग्रामपंचायत परिसरात मेजर सुनील वसंत दौंडे व उमेश रोकडे यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी देशभक्ती गीतावर नृत्य करीत युवकांनी भारत मातेच्या जयजयकाराच्या घोषना देत. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव केला. सैनिक सेवापुर्ती व मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झाली होती. यावेळेस व्यासपीठावर सुभाष हनपुडे, दादा सांगडे, महादेव धोंडे, बापू दौंडे, नेमचंद भुजबळ, भरत औताडे प्रदीप दौंडे, विजय औताडे, संदीप नेटके, हनुमंत रोकडे आदि मान्यवर आणि फिसरे पंचक्रोशीतील युवक बहुसंख्यने उपस्थित होते.
close