shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी विकास संघाचा युवा अध्यक्ष पदी- सागर वेंडाईत..!

धुळे:- आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, आप्पासाहेब नामदेव येळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, सल्लागार ॲड. गणेश सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका अध्यक्ष प्रा.संदीप तवर, जळगांव जिल्हा अध्यक्ष सागर सोनवणे, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, हेमंत सोनवणे, कमलेश मगरे,अशोक काकुळदे यांनी नुकतीच शेवाळी तालुका साक्री जिल्हा धुळे येथील सागर वेंडाईत यांची महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदी निवड केली.

    भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना १९५० ला अमलात आली. या घटनेमध्ये आदिवासी कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर, भिल या आदिवासींना अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या असताना देखील आदिवासींचा सामाजिक शैक्षणिक व राजकीय विकास झाला नाही. त्यांना अनुसूचित जमातीचे जातीचे वैधता दाखल्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. म्हणून आदिवासींची मुले शिक्षणापासून वंचित झाले आहेत. आदिवासींमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. असे मत अनिल वेंडाईत यांनी व्यक्त केले.
    यावेळी आदिवासी विकास संघाचे कार्यकर्ते आदर्श सैनिक रत्न पुरस्कार प्राप्त युवराज वेंडा ईत, गुलाब वेंडाईत, रवींद्र वेंडाईत, अनिल वेंडाईत, सागर वेंडाईत,सौ.रूपा मालचे, सौ. सुनंदा मालचे, विजय मोरे, आकाश मोरे, रमेश गायकवाड, आकाश मालचे, सुशांत वेंडाईत, संजय सोनवणे, अजय सोनवणे, अजय मालचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
close