shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारधी समाजाला इतर योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यमंञी प्राजक्त तनपुरे

राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) दि. ५-४-२०२२

        राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथे राहुरी तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील कुटुंबियांना आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांचे कडून पारधी विकास योजना सन 2021 22 मधून 63 कुटुबिंयांना  सुमारे 9  लाख 92  हजार रूपये किंमतीचे पन्हाळी पत्रे प्रति कुटुंब दहा फुटी आठ पत्र्यांचे  वाटप करण्यात आले. एकुण  63 कुदुंबियांना 504 पत्रे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल गवळी भारत भुजाडी व इतर मान्यवर उपस्थित होते . यावेळी पारधी समाजाला इतरही योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले  तसेच पारधी समाजाने मुलांना शिक्षण द्यावे व शासनाचे विविध योजना व कुटुंबियांचा स्तर उंचवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रस्तावना जाधव यांनी तर आभार प्रदर्शन भिंगारदिवे यांनी केले .
close