कर्डिले व पाचपुते यांचे उपस्थितीत होणार सोहळा
प्रतिनिधी : आसावरी वायकर
देवगाव : ५ / नगर तालुक्यातील देवगाव येथील मळगंगा मंदिर कलषारोहन सोहळा गुरुवार दि.०७/०४/२०२२ रोजी सकाळी ०८.३० वा. कलश मिरवणूक होणार असून ११.०० वा . कलशपुजा व १२.३० वा. कलशारोहन होणार आहे .
मळगंगा मंदिर कलषारोहन सोहळा ह.भ.प.स्वामी हंसानंदपुरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मा. आ. श्री. बबनराव पाचपुते साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतुन मंदिर परिसराचे सुशोभीकरण (७ लक्ष रूपए ) कामाचे भुमिपूजन शुभहस्ते मा.आ.श्री.बबनराव पाचपुते साहेब यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.आ. श्री.शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच मा. श्री. उद्धवराव दुसुंगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .
या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, तरी सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तन मन धनाने सहकार्य करावे
असे मळगंगा देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ देवगाव, ता. नगर, जि.अ.नगर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .

