shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा १११ वा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा..!

शिर्डी । प्रतिनिधी :-
श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा १११ वा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सायंकाळी ४० हजार स्के.फुट श्री साईबाबांच्या रांगोळीचे साईनगर मैदानावर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तसेच श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ मुंबई येथील रांगोळी कलाकारांच्या उपस्थिती विधीवत पूजाअर्चा करून उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 

दरम्यान शिर्डी शहरात वर्षातील सर्वात मोठा श्री रामनवमी उत्सवाची जोरदार तयारी श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे.दि.९ एप्रिल ते १३ एप्रिल या उत्सवादरम्यान रामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या वतीने श्री कमलाकर कोते यांच्या अध्यक्षतेखाली अनेक सांस्कृतिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये साईनगर मैदानात सर्वात मोठ्या साईबाबांच्या प्रतिमेची ४० हजार स्केअर फुटाची रांगोळी काढण्यात येणार असून यासाठी सुमारे ७ हजार टन रांगोळी उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या रांगोळीसाठी भांडून मुंबई येथील श्री साईभजन सांस्कृतीक मंडळ अहोरात्र मेहनत घेणार आहे.


रांगोळी कमिटीचे अध्यक्ष मुकूंद गोंदकर, उपाध्यक्ष मनिलाल पटेल, प्रकाश गोंदकर, प्रतिक शेळके आदीसह कमिटीचे सदस्यांनी शेण, गोमुत्राने मैदान सारवण्यासाठी महिलांना आवाहान केले होते.त्या आवाहानास मोठा प्रतिसाद मिळाला आणी साईनगरचे दोन एकर मैदान शेणाने सारवून तयार केले आहे.या मैदानावर श्री साईबाबांच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी काढणार असल्याने याठिकाणी वेदशास्त्रसंपन्न वैभवशास्री यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली.याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, अँड सुहास आहेर, जयंतराव जाधव, अविनाश दंडवते,माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते,अभय शेळके, सुधाकर शिंदे, बाबासाहेब कोते, मधुकर कोते,नितीन कोते,यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते,दादासाहेब गोंदकर, राहुल गोंदकर, निलेश कोते, जगन्नाथ गोंदकर, दिपक वारुळे, सचिन तांबे, अशोक कोते,मंगेश त्रिभूवन, संदीप पारख,राजेंद्र शिंदे,बाळासाहेब गोंदकर, सचिन लुटे, नरेश पारख,विरेश चौधरी, भरत दवंगे,नितीन शेळके,सलीम शेख, शिर्डी युवा ग्रामस्थ, छत्रपती शासनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिर्डी ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने उपस्थित विश्वस्थांचा सत्कार करण्यात आला.तसेच रांगोळी कलाकारांमध्ये भाई सुर्वे, हेमंत राजभर, नितीन देशमुख,शिजीराव भोसले,अभिजीत सुर्वे आदीचा सत्कार केला आहे.यावेळी विश्वस्तांनी यंदाच्या श्री रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार असून पुढील वर्षी या उत्सवाचे स्वरूप आणखी मोठे असणार असल्याचे सांगत यात्रा कमिटीच्या वतीने पार पडत असलेल्या कार्याचे कौतुक केले.यंदाच्या  वर्षी रांगोळीचे गिनीज बुक आँफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी सांगितले.मात्र गिनीज बुक आँफ लंडन मध्ये या रांगोळीची नोंद होणार असल्याचे रांगोळी कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
close