shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खोरोची साखरेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न .

खोरोची साखरेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा पूर्वतयारी मेळावा  संपन्न .

तेजीपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांची प्रमुख उपस्थितीत.
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद शाळा साखरे वस्ती खोरोची येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.या वेळेस पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांचे स्वागत गुलाब पुष्प ,फुगे देऊन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व मुले शिक्षक  व पालकांनी प्रभात फेरी काढली,  चला शाळेला जाऊया प्रवेश घेऊया अशा घोषणा देण्यात आल्या, आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत वचे गुरुजी यांनी केले .
यावेळी बोलताना अनिताताई खरात म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या शाळेची खूप चांगली प्रगती होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना  प्रवेश घेण्यासाठी पालकवर्ग उत्साही आहेत. त्याचे कारण गुरुजनांनी सुधारलेली शिक्षण पद्धती. आपल्या शाळेत आपल्याला कोणतीही उणीव असेल तरी या शाळेची विद्यार्थिनी म्हणून तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल.

यावेळी अनिता खरात यांनी वचे गुरुजींचे विशेष आभार मानले .

कारण वचे गुरुजी आल्यापासून शाळेला चांगले दिवस आले असे खरात  म्हणाल्या तसेच त्यांनी जाधव गुरुजी अंगणवाडी सेविका कुंभार मॅडम मुलानीं   मॅडम यांचे कौतुक केले, या कार्यक्रमासाठी सर्व तयारी वचे गुरुजी  कुभांर मँडम मुलानी मँडम यांनी केली.

 या वेळी  संतोष साखरे, अनिताताई  खरात ,नानासाहेब खरात, रमेश साखरे, अर्चना दिलीप वाघमोडे यांच्या हस्ते पहिलीच्या वर्गाची रिबीन कापून  मुलांचे स्वागत करून मुलांची  शाररीक चाचनी , नाव नोंदणी बौद्धिक विकास ,वजन, भाषा विकास असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले .
close