राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये महादेवजी जानकर यांनी योगदान देत घडवले अनेक सामाजिक कार्यकर्ते - श्रीनिवास सातपुते
इंदापूर शहराध्यक्ष रा स प.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या ५४ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख...
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांचा ५४ वा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इंदापूर शहर अध्यक्ष श्रीनिवास सातपुते यांनी व्यक्त करताना म्हटले की, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्वांची उन्नती घडावी या उद्देशाने त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले योगदान देत अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवले आणि हे करीत असतानाच त्यांनी राजकीय क्षेत्रात हिरारीने भाग घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संस्थापकअध्यक्ष तसेच माजी मंत्री महादेव जानकर यांचा जन्म१९ एप्रिल १९६८ साली
सातारा जिल्ह्यातील वाडे या गावात मेंढपाळाच्या वाड्यावर जन्म झाला असून त्यांनी सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजेनिअरिंग येथे बी ई (BE) पदवी प्राप्त करून त्यामध्ये गोल्डमेडिलिस्ट झाले. असे उच्च शिक्षीत असलेले महादेव जानकर यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मंडल आयोगाच्या चळवळीपासून१९९१ मध्ये कांशीरामजी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.१९९५ साली यशवंत सेनेची स्थापना करण्यात आली.१९ ऑगस्ट २००३ राष्ट्रीय समाज पक्षाची चोंडी येथे स्थापना केली.
२००५ साली सांगली पोटनिवडणूक एकूण लक्षणीय मते घेऊन राज्यभर चर्चा झाली.२००९ साली माढा मतदार संघातून शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकून एक लाख मते घेतली.२०१४ साली पवारांचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून तब्बल ४ लाख ५२ हजार मते घेतली आणि देशभर चर्चा जानकर यांची झाली.२०१७ साली महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले.२०१९ साली स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्ष मधून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली असे असणारे महादेवजी जानकर आम्हाला लाखो कार्यकर्त्यांना असणारे आमचे मार्गदर्शक व आदरणीय स्थान असलेले आमचे नेतृत्व आहेत आज त्यांचा ५४वा अभिष्टचिंतन दिनाच्या त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा आणि या देशांमध्ये समता स्वतंत्रता आणि बंधुता या विचाराला घेऊन म्हणजेच विस्थापितांना प्रस्थापित करून या देशाचे राजकारण आणि समाजकारण होवो हीच अपेक्षा.

