shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा चेस सर्कलच्या वतीने तीन वर्षानंतर प्रथमच पटावरी मानांकन बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्यावतीने 50 हजार रुपयांची रोख बक्षिसे

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

अहमदनगर: दि. 20 / जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा चेस सर्कलच्यावतीने तीन वर्षानंतर प्रथमच पटावरी मानांकन बुद्धीबळ स्पर्धा शुक्रवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वा. बडिसाजन मंगल कार्यालय, स्टेशन रोड, नगर येथे संपन्न होत असल्याची माहिती राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून खेळाडू सहभागी होणार आहेत. 2300 मानांकपेक्षा कमी, 2000 मानांकनापेक्षा कमी तसेच 1700 पेक्षा कमी मानांकित अशा तीन गटात ही स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि.24 रोजी दुपारी 4 वा. होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली. साडेचार वर्षांचा पार्थ शिंदे (पुणे) हा सर्वात लहान खेळाडू तर 76 वर्षांचे विजय कुलकर्णी हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 50 हजार रुपयांची रोख पारितोषिके शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्यावतीने प्रायोजित केले आहे असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.

या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रविण ठाकरे (जळगांव), सहा.पंच अजिंक्य पिंगळे (मुंबई) हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेत पुणे, जळगांव, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई येथील एकूण 180 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वश्री पारुनाथ ढोकळे, सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, देवेंद्र वैद्य, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनिष जैस्वानी, अविनाश कांबळे, प्रकाश गुजराथी आदि प्रयत्नशील आहेत. तरी ही रोमांचकारी स्पर्धा पाहण्यासाठी नगरकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
close