shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकदिवसीय कवी संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक रज्जाकभाई शेख

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -  मराठी मातीतील मराठी साहित्यिक मांदियाळी असणारे राज्यपातळीवरील लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य संस्थेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन यावेळी महाराष्ट्र राज्यातील श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात १७ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. यातील कवी संमेलनाध्यक्षपदी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) यांची आयोजन समितीतर्फे एकमताने निवड करण्यात आली असल्याचे माहिती आयोजकांनी दिली.

साहित्यसंमेलनासाठी श्रीरामपूर विधानसभा सदस्य आमदार लहुजी कानडे,गीतकार चंदन कांबळे,संमेलनाध्यक्ष सुभाष सोनवणे,सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पवार आणि प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. रज्जाक शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या अकराशेपेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.कथा व लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात  त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.लातूर येथे ज्ञानतीर्थ पुरस्कार, नागपूरहून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवंत शिक्षक पुरस्कार,पुण्यातून संत एकनाथ स्मृतिगौरव पुरस्कार, अहमदनगरहून ध्यैय आदर्श शिक्षक पुरस्कार,शिर्डीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाण्याहून प्रेरणा    उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यासारखे विविध सामाजिक संस्थाकडून वीस शिक्षक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहे.
शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता, लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,
गझल,काव्यांजली,अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे. त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी ९ न्यूज, अहमदनगर महानगर न्यूज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे.

 वर्ल्डसामना,शब्दरसिक,क्रांतिसूर्य,लक्ष्मीपुत्र,गोंदण,ग्रामसेवा,आसमत काव्यप्रेमीचे, भगवानबाबा आदी दिवाळी अंकात त्यांच्या या  दर्जेदार कविता प्रतिलिपी, स्टोरीमिरर, लागीर झालं या ऍपवर सापडतात ते जीवन गौरव शैक्षणिक मासिक सहसंपादक,शब्दविद्या दिवाळी अंक उपसंपादक,काव्यदरबार बालकाव्य विशेषांक संपादक या पदावर ते साहीत्य चळवळीचे काम पाहतात,आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात, अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.

काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत आठ्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.लहान मुलांना कवितांची मेजवानी देण्यासाठी "काव्यदरबार" या बाल दिवाळी अंकाचे संपादन केले आहे.आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून कोरोना जागृती करण्यासाठी आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली. राज्यातील विविध वृत्तपत्रातून "खेळू करू शिकू" या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत 'काव्यदरबार' हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिलाआहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कविता सादरीकरणाची हॅट्रिक झाली आहे.यासंमेलनात पत्रकार राजेंद्र देसाई,डॉ.गुंफाताई कोकाटे, पत्रकार प्रकाश कुलथे,ग्रामीण कवी आनंदा साळवे,कवी मिराबक्ष बागवान,डॉ.बाबुराव उपाध्ये, सुनील गोसावी,भास्कर लगडदादा उपस्थित राहतील.शेख यांचे निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
close