shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अट्टल चोरटे, सोलापूर येथे सोने चोरी करुन विकतात पूर्णेच्या सराफांना..! स्थानिक पोलीसांच्या हातावर तुरी..!!


पूर्णा । प्रतिनिधी :-शहरातील काही सराफा ज्वेलर्स दुकानदारास गत काही दिवसापासून लपून छपून सोलापूर येथील व ईतर आंतरराष्ट्रीय अट्टल गुन्हेगार चोरटे सोने चोरी करतात आणि चोरीतील सोने पूर्णा येथील सराफा दुकानदारास विकत आहेत. असाच प्रकार सध्या नुकताच उघडकीस झाला आहे. 

सोलापूर येथे काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यातील चोरट्यांनी पूर्णा येथे सराफांना सोने विकल्याची माहिती सोलापूर पोलीसांनी मिळाली होती. त्यावरुन सोलापूर पोलीसांनी चोरट्यास सोबत पूर्णा येथे आणले होते त्यांनी एका सोनारास सोने विकल्याची कबूली दिली. चोरीतील सोने विकत घेणा-या सराफा दुकानदाराची बराच वेळ चौकशी केल्यावर दुकानदाराने २३ तोळे सोने विकत घेतल्याचे सांगितले. सदर सोने पोलीसांनी जप्त केले आहे. आणि सदर सराफा दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. या पध्दतीने अट्टल गुन्हेगार चोरी करुन सोने  पूर्णेत आणून विकत आहेत. तरीही पूर्णा पोलीसांना याचा थांगपत्ता लागत नाही. याला काय म्हणावे? यापूर्वी देखील सोने विकत घेण्याच्या घटना पूर्णा येथे घडल्या आहेत. येथील सराफा दुकानदार कमी किंमतीत सोने विकत घेण्यास लखले आहेत. या घटनेमुळे पूर्णा येथील सराफा दुकानदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत..
close