एक पोलिस कर्मचारी जख्मी 4 अटकेत 24 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..!
पूर्णा । प्रतिनिधी :
पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे पिंपळा लोखंडे येथे रविवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास डीजे वाजण्याच्या कारणावरून गावकरी व पोलीस आमने सामने आले या मधील काही युवकांनी पोलिस प्रशासनाच्या गाडीवर चढून पोलिसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी फौजदाराची रिवाल्वर खेचण्याचा प्रयत्न करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला एकंदरीतच मोठा पोलिस फौजफाटा माग विल्यामुळे गेल्यामुळे अनर्थ टळला दरम्यान उशिरा चुडावा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवळपास गावातील 25 आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून यामधील चार आरोपींना गजाआड करण्यात आले आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजकीय प्रस्थापितांची गाव असलेल्या मौजे पिंपळा लोखंडे येथे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावामध्ये सुरू असलेल्या सण उत्सवानिमित्त काही युवकांनी डीजे लावला होता या डिजेला शासकीय स्तरावर परवानगी घेण्यात आली नव्हती त्यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास चुडावा पोलीस स्टेशनचे फौजदार गुलाबाचे वाढवे घटनास्थळावर गेले होते त्यांनी गावातील युवकांना तुम्हाला डिजे ची परवानगी नाही तुम्ही मिरवणुका काढू नका असे सांगितले परंतु गावकरी व पोलीस प्रशासन यामध्ये अधिक असताना वाढत गेला तणाव वाढत जात असल्याचे पाहून फौजदार गुलाब बाचे वाड यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना बळाचा वापर करण्याच्या सूचना केल्या परंतु तेव्हाही जमाव ऐकतच नव्हता.
यामध्ये काही जणांनी गावकऱ्यांनी शासकीय पोलीस गाडी च्या वर चढून पोलीस गाडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केली धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला जमाव अधिकच आक्रमक होत असल्यामुळे उपस्थित पोलीस शि पायांनी जमावाला पांगविण्यासाठी बळाचा थोडा वापर केला परंतु त्या ठिकाणी ग्रामस्थांना समोर पोलीस कमी होते दरम्यान या घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर पूर्ण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व काही पोलिस कर्मचारी धावून गेली तोपर्यंत जमाव अधिकच दिवस झाला होता.
दरम्यान बाहेरून भागविल्यापोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर जमाव पांगला शासकीय पोलीस वाहन शासकीय गाडीचा ताबा घेण्यासाठी सरसावलेल्या युवकांना पोलिसांनी बाजूला केली दरम्यान रात्री आठ पर्यंत संपूर्ण गावामध्ये तणाव तर असे वातावरण होते ज्यादा पोलिसांची कुमक मागविली यानंतर शांत झाला दरम्यान याप्रकरणी चुडावा पोलीस स्थानकात साहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाढ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळा लोखंडे येथील आरोपी निखिल वैजनाथ लोखंडे आदिनाथ बालाजी लोखंडे नागेश दत्तराव लोखंडे नारायण होनाजी लोखंडे साईनाथ हनवता लोखंडे मारुती भानुदास लोखंडे अंगद श्रीपती लोखंडे पांडुरंग दौलत लोखंडे विष्णू देविदास लोखंडे गणेश संभाजी पारवे धोंडीराम बालाजी लोखंडे पप्पू मारोती लोखंडे मंगेश माधव लोखंडे देविदास नामदेव लोखंडे गोविंद केशव लोखंडे कैलास आनंद लोखंडे नवनाथ तातेराव लोखंडे विठ्ठललिंबाजी लोखंडे हर्जी दौलत जाधव देविदास निवृत्ती लोखंडे दत्ता सोमाजी पारवे नारायण होनाजी पारवे शंकर होनाजी पारवे राहणार पिंपळा लोखंडे व डीजेचा चालक भुजंग नरहरी कुसळे राहणार खांडेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या सर्वांच्या विरुद्ध कलम 353 332 323 504 506 427 143 147 149 भादवि कलम सह बीपी ॲक्ट कलम 135 आणि गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणातील चार आरोपी हरजी दौलत जाधव देविदास निवृत्ती लोखंडे दत्ता होनाजी पारवे भुजंगधारी कुसळे या चौघांना पोलिसांनी गजाआड केले आहे दरम्यान उर्वरित 20 ते 22 आरोपीच्या शोधामध्ये वेगवेगळी पथके परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यासह इतर ठिकाणी पाठविण्यात आली असल्याची माहिती येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाबा बाचजवाड यांनी दिली दरम्यान दोन दिवसापासून पिंपळा लोखंडे या गावांमध्ये परिस्थिती असून सर्व आरोपींना येत्या काही दिवसांमध्ये गजाआड करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

