shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख यांनी क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर व परिसराला दिली भेट.

जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख यांनी क्षेत्र निरा  नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर व परिसराला दिली भेट.
फोटो:श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान तिर्थ क्षेत्र आराखड्यातील विविध विकास कामाची पाहणी व देवदर्शन करताना जिल्हाधिकारी .

इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख यांनी दि. २० एप्रिल रोजी क्षेत्र निरा नरसिंहपूर ता.इंदापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान तिर्थ क्षेत्र आराखड्यातील विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला .या वेळी श्री लक्ष्मी नृसिंह देवाची पुजा आरती केली व  दर्शन घेऊन मंदिरात चालु असलेल्या कामांची स्वतः पाहणी  केली व कामाचा आढावा घेतला .
यावेळी देवस्थान, ग्रामपंचायत यांचे वतीने जिल्हाधिकारी यांचा शाल पगडी देउन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रांत अधिकारी  दादासाहेब काबळे,तहसीलदार  श्रीकांत पाटील ,पुरात्व विभागाचे रामचंद्र निप्पाणी ,बांधकाम विभागीय अधिकारी ,पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                   मंदीरपासून नीरा नदी काठी जाऊन पाहणी केली तसेच काय मंदिरातील जे काम चालू आहे       त्यांना सूचना केल्या व सुरक्षा भिंतीचे  संदर्भात विशेष ऑडिट करून त्याबाबत अधिकचा लागणारा निधीची उपल्बध करून देउ असे जिल्हाधिकारी म्हणाले.

 पुरातत्व विभागाचे   रामचंद्र निपाणी यांनी जिल्हाधिकारी यांना कामाचे स्वरूप व कामाचा दर्जा या विषयी माहीती दिली. देवस्थानचे वतीने नरसिंहपूर(अडोबावस्ती) येथील नरसिंह तिर्थ या ठिकाणी असलेल्या मंदिर परिसरासह घाट दुरूस्ती  तिर्था ठिकाणी  जाण्यासाठी रस्ता करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.ग्रामपंचायत वतीने सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील पिण्याचा  पाणीप्रश्‍न त्वरीत मार्गी लावण्यात यावा ही विनंती केली,त्या वेळी उपस्थित असणारे  पाणीपुरवठा अधिकारी यांना सुचना करून पंधरा दिवसात पाणी उपल्बध करुन देण्याच्या सुचना केल्या.तसेच नवीन बाधलेल्या भक्त निवासाची पाहणी व पोलीस चौकीची पाहणी केली .यावेळी ग्रामपंचायत नरसिंहपूरचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, तलाठी,ग्रामसेवक, महसुल विभागांचे अधिकारीवर्ग पोलीस अधिकारी उपस्थित होते.

.................................................................

close