shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भगवान महावीर यांनी दाखविलेला अहिंसेचा मार्गच समाजाला पुढे नेऊ शकतो - नंदकुमार कंगळे


तहसिलदार व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी :संजय वायकर

पंढरपूर : १८ /  जैन समाजाचे चोविसावे तीर्थंकार भगवान महावीर हे अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांनी जगाला दाखविलेला अहिंसेचा मार्ग हा समाजात शांतता, सलोखा टिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे. अहिंसेचा मार्गच समाजाला पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्री .नंदकुमार  कंगळे यांनी केले. दि . १७ एप्रिल रोजी महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले.

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने जैन बांधवांनी ठिकठिकाणी धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबविले . ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली .

 यावेळी अध्यक्ष श्री .अनिल जमगे म्हणाले की, कलियुगामध्ये अहिंसेच्या मार्गावर चालणे ही साधना आहे. जगाचा इतिहास सांगतो की ज्यांनी ज्यांनी हिंसेच्या मार्गावर वाटचाल केली त्यांचा शेवट हा वाईट झाला आहे. हिंसा समाजात अशांतता निर्माण करते, तर अहिंसा मानवाला प्रेमाचा संदेश देत माणसा - माणसाला एकमेकां जवळ आणतो. भगवान महावीर यांनी जगाला दाखविलेला अहिंसेचा मार्ग हा सर्व धर्मियांसाठी जीवन जगण्यासाठीचा शाश्वत मार्ग आहे.

यावेळी श्री.अनिल जमगे अध्यक्ष, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी महाराष्ट्र अंचल. मा.श्री.कव्हेकरसाहेब तहसीलदार पंढरपूर, डाॅ.राजेश फडे संयोजक भ.महावीर जन्म कल्याणक महोत्सव आणि देवेंद्र शेटगार आदि मान्यवर उपस्थित होते .
close