श्री राम नवमी उत्सवाच्या दिवसी दर सालाबाद प्रमाणे साईबांबाचा संदल (ऊरुस) मुस्लीम समाजाच्या वतीने साईबांबाचे सेवक हाजी अब्दुल बांबाच्या परीवाराच्या वतीने काढण्यात आला. हाजी अब्दुल बाबा झोपडी पासुन ते पालखी रोडने मोठ्या उत्सवात साईबाबा समाधीला संदल लावण्यात आला.
त्यावेळेस हाजी अब्दुल बांबाचे नातु हमीदबाबा पठाण यांनी बाबांचा समाधी वर दुवा फातीहा करुन हाजी अब्दुल परीवारा कडून बाबांचा समाधी वर चादर चढवण्यात आले. या वेळेस सबका मालीक एक व सर्व धर्माचा प्रतिक म्हणून दिसुन आले . या कार्यक्रमाचे नियोजन हाजी अब्दुल बांबाचे वंशज हमीद बाबा पठाण. रहीमबाबा पठाण, रज्जाक पठाण,गफ्फारखान पठाण ,शब्बीर पठाण गणी पठाण,शौकत पठाण आदि मान्यवरांनी केले होते.
दोन वर्षा पासुन कोरोना 19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व रूढी पंरमपरा विधी व्रत पुजा अर्चना बंद करण्यात आले होते ..ह्या वर्षी शासन व प्रशासन साईबाबा संस्थान विश्वस्त यांनी श्री रामनवमी नवमी निमीत्त सर्व रूढी पंरमपरा सुरू करण्याची आदेश पारित केल्याने ग्रामंस्था मध्ये साईभक्तामध्ये नवचैतन्य आनंद दिसुन आला व श्री राम नवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .त्या निमित्ताने सर्व धर्माच्या लोंकानी शासनाचे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे आभार मानले.
असे साईबांबाचे सेवक हाजी अब्दुल बाबांचे पणंतू गफ्फारखान पठाण यानी आपल्या पञकात म्हटले आहे.

